Pune crime | पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यात एका 19 वर्षीय तरुणीवर निर्जन स्थळी चाकूचा धाक दाखवत दोन नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार करून पीडितेकडे असलेले दागिने लुटून तेथून फरार झाले. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Pune crime)
कशी घडली ही धक्कादायक घटना?
रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती.
त्याच वेळी दोन अज्ञात तरुण दुचाकीवर तिथे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत तरुणीवर आळीपाळीने बलात्कार केला. इतकेच नव्हे, तर पीडितेला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडून संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ देखील शूट केला.
या गुन्हेगारांनी केवळ बलात्कारच केला नाही, तर पीडितेकडील सोन्याची नथ आणि पेंडेंट घेऊन पसार झाले. या घटनेनंतर पोलीस तक्रार करण्यात आली. अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तसेच लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच स्वारगेट बस स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. आता शिरूर तालुक्यात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. (Pune crime)
Title : Pune Crime Shocking Rape Case 19-Year-Old Girl Assaulted






