बंडू आंदेकरच्या घरात ६७ लाखांचे दागिने आणि ‘इतक्या’ लाखांची रोकड; आकडा वाचून थक्क व्हालं

On: September 12, 2025 1:54 PM
Andekar Gang
---Advertisement---

Bandu Andekar Raid | पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडानंतर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर (Bandu Andekar) याच्या घरावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या झडतीत पोलिसांच्या हाती कोट्यवधींचा मुद्देमाल लागला आहे.

बंडू आंदेकरच्या घरातून काय काय मिळालं? :

गुन्हे शाखेच्या तपासात आंदेकरच्या घरातून मोठं घबाड बाहेर आलं. पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला :

तब्बल ६७ लाखांचे सोन्याचे दागिने

२ लाख ५० हजार रुपयांची रोकड

चांदी

एक अलिशान मोटार कार

विविध करारनामे आणि कर भरल्याच्या पावत्या

जमीन व्यवहाराशी संबंधित इसार पावत्या

या सर्व जप्त मालामुळे आंदेकरच्या संपत्तीचे प्रमाण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

Bandu Andekar Raid | आंदेकरच्या मुलीच्या घरातून काय मिळालं? :

याच प्रकरणात पोलिसांनी आंदेकरची मुलगी वृंदावनी वाडेकर आणि तिची दोन मुले स्वराज व तुषार यांच्या घराची झडती घेतली. तिथून पोलिसांना :

१६ मोबाईल फोन

२१ हजारांची रोख रक्कम

दागिने खरेदीच्या पावत्या

एक दुचाकी

हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस तपासाचा फोकस :

पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आणि उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आंदेकर टोळीला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जात असून त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार आहे. (Bandu Andekar Raid)

आंदेकरच्या घराभोवती तब्बल २५ हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते, हे देखील पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. दरम्यान, या प्रकरणातील पाच आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

News Title: Pune Crime: Police Raid Bandu Andekar’s House, Seize ₹67 Lakh Jewellery, ₹2.5 Lakh Cash & Luxury Car

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now