Pune Crime News: राज्यात सध्या गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसत आहेत. पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील लोणीकंद (Lonikand, Pune) भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमका काय प्रकार घडला?
पुण्याच्या लोणीकंद भागातील (Pune News) एका मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलावलं आणि स्वतःच्या कारमध्ये तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी (Lonikand Police Station, Pune) दिलेल्या माहितीनुसार, दोघांची एकमेकांसोबत चांगली मैत्री होती, या मैत्रीतूनच मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं. मुलगी भेटायला आली नाही तर त्याने तिला एक धमकी सुद्धा दिली होती. तू जर मला भेटायला आली नाहीस तर मी जीव देईल, असं त्याने संबंधित मुलीला म्हटलं होतं. मुलाने धमकी दिल्यामुळे मुलीचा सुद्धा नाईलाज झाला होता, त्यानंतर संबंधित प्रकार घडला आहे.
मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं-
आरोपी तरुण फिर्यादी मुलीचा मित्र आहे, त्याने तिला भेटण्यासाठी बोलावलं होतं. मुलीने नकार दिल्यानंतर तिला धमकी देण्यात आली यामुळे मुलीला आरोपी मुलास भेटणं भाग पडलं. (Pune Crime News)
संबंधित मुलाला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने तिला स्वतःच्या कारमध्ये बसायला सांगितलं. कारमध्ये बसल्यानंतर त्याने कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आरोपीने याबाबत कोणाला काही सांगितलं तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन, अशी धमकी दिली, तसेच तिच्या वडिलांना शिवीगाळ देखील केली. जून 2021 ते सप्टेंबर 2023 च्या दरम्यान हा प्रकार घडल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
आरोपी वारंवार धमकी देत होता त्यामुळे मुलीने त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री 11 वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत जाऊन तिच्या वडीलांना शिवीगाळ केली. या प्रकरणी तरुणीने पोलिसांत (Pune News) धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यावरुन गौरव बोराटे या 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
News Title: Pune Crime News Lonikand police Station
महत्त्वाच्या बातम्या-
लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांची संख्या ‘इतक्या’ कोटींवर पोहोचली, आकडेवारी समोर
‘कॅम्पा कोला’नंतर रिलायन्सनं खरेदी केली महाराष्ट्रातील ही प्रसिद्ध कंपनी!
आता कपिल देव करणार शेती!, महाराष्ट्राच्या ‘या’ भागात खरेदी केली शेतजमीन
पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण!, म्हाडाकडून 1 हजार 700 घरांबाबत महत्त्वाची घोषणा
बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढणार?, शरद पवारांनी केली मोठी घोषणा






