कारमधून आले, पिस्तूल काढलं नंतर जे घडलं त्याने पुणे हादरलं!

On: March 17, 2024 2:33 PM
Pune News
---Advertisement---

Pune News | पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. या पुण्यामध्ये गुन्हेगारी (Pune News) सत्र वाढतच आहे. दिवसाढवळ्या खून, अपराधासारख्या घडामोडी (Pune News) घडताना दिसत आहेत. गोळीबारासारख्या धक्कादायक घटना घडताना दिसत आहेत. अशीच एक घटना पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये घडली आहे. एका हॉटेलमध्ये गोळीबार झाला आहे. यामध्ये अविनाश धनवे रा. आळंदी याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज जप्त केलं आहे.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळणार हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पा रंगल्या मात्र पुढं आपल्याबाबत असं काही घडेल हे त्यांना स्वप्नामध्ये देखील वाटलं नाही. (Pune News)

अविनाशवर गोळीबार

जेवण करत असताना ते काहीजण हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी पिस्तूल काढलं आणि अविनाशवर गोळीबार केला. आणखी काही युवक आले आणि त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार केले. त्यानंतर सर्वजण हत्या करून फरार झाले. अविनाशसोबत तिघेजण होते ते प्रचंड घाबरले आणि त्या तिघांनी तिथून पळ काढला हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झालं.

शनिवारी सायंकाळी 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. या हल्ल्याची माहिती शहरामध्ये पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली. घटनास्थळी पोलिसांनी भेट देत शोध घेण्यास सुरूवात केली आहे.

कोयता गँगच्या म्होरक्याचा एंड

अविनाश धनवे हा गुन्हेगार आहे. यामुळे गुन्हेगारी वादातून ही हत्या झाली आहे. अविनाश धनवे हा कोयता गँगचा म्होरक्या होता. त्याला अज्ञातांनी संपवलं आहे. गुन्हेगारीच्या वादातून ही हत्या झाली आहे. (Pune News)

अविनाश धनवे हा गेली पंधरा वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रामध्ये होता. त्यांच्या आळंदी आणि भोसरी पोलीस ठाण्यामध्ये विविध गुन्हे दाखल केले आहेत. ते येरवडा कारागृहात असताना कैद्यांची आणि त्याची हाणामारी झाली.

News Title – Pune Crime News Koyta Gang

महत्वाच्या बातम्या

58 व्या वर्षी सिद्धू मूसेवालाच्या आईने दिला बाळाला जन्म, फोटो समोर

‘हा’ बडा नेता मध्यरात्री मनोज जरांगेंच्या भेटीला!

मराठी इंडस्ट्री का मागे आहे? गश्मीर महाजनी म्हणाला…

“वयाने लहान मुलाशी लग्न केलं तरी..”, बबिताजीची पोस्ट नेमकी कुणासाठी?

क्रिकेटप्रेमींना धक्का, निवडणुकांमुळे आयपीएलमध्ये मोठे बदल?,मोठी माहिती समोर

Join WhatsApp Group

Join Now