पुणेकरांची धडधड वाढली! शैक्षणिक सहलीला गेलेले ८० विद्यार्थी दुबईत अडकले; मदतीसाठी पालकांचा टाहो

On: March 2, 2026 2:52 PM
Pune Students Dubai
---Advertisement---

Pune Students Dubai | मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका थेट भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. अमेरिका (United States) आणि इराण (Iran) यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे (Pune) येथील एका कॉलेजचे तब्बल 80 विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई (Dubai) येथे गेले होते, मात्र अचानक विमानसेवा बंद झाल्याने हे विद्यार्थी तिथेच अडकले आहेत. विद्यार्थी सुरक्षित असले तरी भारतात त्यांचे पालक चिंतेत आहेत.

शैक्षणिक सहलीवर गेलेले 80 विद्यार्थी दुबईतच थांबले :

पुण्यातील एका व्यवस्थापन महाविद्यालयातील एमबीएचे विद्यार्थी शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी दुबई (Dubai) येथे गेले होते. या सहलीत एकूण 80 विद्यार्थी सहभागी झाले होते. नियोजनानुसार हे सर्व विद्यार्थी 1 मार्च रोजी विमानाने भारतात परतणार होते. मात्र, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्य-पूर्वेत तणाव वाढला आणि त्याचा थेट परिणाम विमानसेवेवर झाला. दुबई विमानतळावरून उड्डाण घेणारी अनेक विमाने रद्द करण्यात आली, त्यामुळे या विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास रखडला.

सध्या हे सर्व विद्यार्थी दुबईत सुरक्षित ठिकाणी आहेत आणि एकमेकांच्या संपर्कात आहेत. मात्र, अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हिंगोली (Hingoli) येथील खुशी बढेरा (Khushi Badera) ही विद्यार्थिनीही या गटात अडकली आहे. तिच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे विनंती केली असून, युक्रेन संकटाच्या वेळी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही सुरक्षितपणे मायदेशी परत आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांशी नियमित संपर्क होत असला तरी पालकांची अस्वस्थता कमी झालेली नाही.

Pune Students Dubai | रायगडमधील विद्यार्थीही दुबईत, कुटुंबीय संपर्कात :

या पार्श्वभूमीवर रायगड (Raigad) जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उत्कर्ष मपारा (Utkarsh Mapara) हाही दुबईत अडकलेला आहे. तो ग्लोबल एमबीएच्या सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला होता. सध्या तो स्वतंत्र रूममध्ये राहत असून सुरक्षित असल्याची माहिती त्याचे वडील राजेश मपारा (Rajesh Mapara) यांनी दिली आहे. उत्कर्ष नियमितपणे कुटुंबीयांच्या संपर्कात आहे, मात्र मध्य-पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे घरच्यांची चिंता वाढलेली आहे. (Pune Students Dubai)

या संपूर्ण घडामोडींमुळे परदेशात शिक्षणासाठी किंवा सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुबईसह इतर आखाती देशांमध्ये अनेक भारतीय प्रवासी अडकले असल्याने केंद्र सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवावे आणि गरज पडल्यास विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे. सध्या विद्यार्थी सुरक्षित असले तरी विमानसेवा सुरळीत कधी सुरू होईल, याबाबत अनिश्चितता कायम आहे.

News Title: Pune College Students Stranded in Dubai

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now