Pune Air Pollution Alert | पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवेचा दर्जा सातत्याने खालावत असून, विशेषतः हिंजवडी आणि वाकड परिसरातील हवा आता ‘अतिखराब’ श्रेणीत पोहोचली आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (PM2.5 Level Pune, Air Quality Index Pune)
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) ताज्या आकडेवारीनुसार, पुणे शहराचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) वेगाने वाढताना दिसत आहे. शुक्रवारी 220 असलेला हा निर्देशांक रविवारी 232 वर पोहोचला. मात्र, वाकड आणि हिंजवडी परिसरातील परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचं चित्र आहे, ज्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
वाकड-हिंजवडीतील हवा अतिखराब पातळीवर :
वाकड परिसरात रविवारी सायंकाळी 4 वाजता हवेतील घातक सूक्ष्म धूलिकणांचे म्हणजेच PM 2.5 चे प्रमाण तब्बल 307 नोंदवण्यात आलं. हे प्रमाण मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानलं जातं. भूमकर चौक आणि लगतच्या परिसरातही AQI 300 च्या पुढे गेल्याने या भागातील हवा श्वास घेण्यायोग्य राहिलेली नाही, असं तज्ज्ञ सांगत आहेत.
हिंजवडी आयटी पार्क (Hinjewadi), वाकड (Wakad), ताथवडे आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेली अनियंत्रित बांधकामं, रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लॅन्ट्स आणि सातत्याने वाढणारी वाहनसंख्या हे प्रदूषणामागील प्रमुख कारणं मानली जात आहेत. आयटी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक आणि महामार्गावरील कोंडीमुळे वाहनांच्या धुरातून निघणारे घातक वायू हवेत मिसळत आहेत. (Pune Air Pollution Alert)
Pune Air Pollution Alert | नागरिकांच्या आरोग्यावर थेट परिणाम, तज्ज्ञांचा इशारा :
हवेची गुणवत्ता ‘अतिखराब’ स्तरावर पोहोचल्यामुळे केवळ लहान मुले आणि वृद्धच नव्हे, तर निरोगी व्यक्तींनाही श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत. खोकला, घसा खवखवणे, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आणि श्वास घेण्यास अडचण अशा समस्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. या प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास फुफ्फुसांचे गंभीर आजार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (Hinjewadi Wakad AQI)
डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून, मास्कचा वापर करण्यास आणि लहान मुलांना शक्यतो घरातच ठेवण्याचं आवाहन केलं आहे. जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येत्या काळात पुणेकरांसाठी हा प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.






