पुणेकरांसाठी गुडन्यूज! शहरातील ‘या’ भागात 28 किमी लांबीचा बोगदा होणार

On: October 16, 2025 2:19 PM
Pune Tunnel Project
---Advertisement---

Pune Tunnel Project | पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. शहरात खडकवासला ते फुरसुंगी या मार्गावर तब्बल 28 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्र सरकारच्या पर्यावरण मंडळाने हिरवा कंदील दिला आहे. जलसंपदा विभागाने बोगदा खोदाईचं काम युद्धपातळीवर सुरू केलं असून, पहिल्या टप्प्यात वडाची वाडी आणि उरुळी देवाची येथे खोदाई सुरू आहे. (Khadakwasla to fursungi tunnel)

या बोगद्याच्या माध्यमातून खडकवासला धरणातील पाण्याची गळती आणि चोरी रोखणे हा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे पुणे शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असून, दरवर्षी कोट्यवधी लिटर पाण्याची बचत होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. (Pune Tunnel Project)

ब्लास्टिंग सुरू, दोन ठिकाणी जलदगतीने काम :

या प्रकल्पासाठी पर्यावरण मंडळासोबत पोलिस आणि इतर खात्यांची परवानगी घेण्यात आली आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर बोगदा खोदाईसाठी ब्लास्टिंगचं काम अधिकृतपणे सुरू करण्यात आलं आहे. कामाचं निरीक्षण करण्यासाठी ‘क्वालिटी युनिट कंट्रोल’ टीम नेमण्यात आली असून, सुरक्षेच्या सर्व उपाययोजना राबवल्या जात आहेत. (Khadakwasla to fursungi tunnel)

या बोगद्याचं काम हैदराबाद येथील एका नामांकित कंपनीला देण्यात आलं आहे. कंपनीने या प्रकल्पासाठी 150 कर्मचारी नेमले आहेत, ज्यामध्ये अभियंते, प्रकल्प व्यवस्थापक आणि तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. पुढील अडीच वर्षांत बोगद्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Pune Tunnel Project | खडकवासला ते फुरसुंगी मार्गाचे टप्पे :

बोगद्याचं पहिलं टप्पं वडाची वाडी ते उरुळी देवाची असा असून दुसऱ्या टप्प्यात कात्रज आणि धायरी परिसरात काम हाती घेतलं जाणार आहे. प्रकल्पासाठी आर.एम.सी. प्लांट, क्रशर आणि प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पुणेकरांना पाणीपुरवठ्याशी संबंधित दीर्घकालीन लाभ मिळण्यासाठी या प्रकल्पाची गती वाढवण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. (Pune Tunnel Project)

या बोगद्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा वाहतूक मार्ग अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. यामुळे पाण्याची गळती, चोरी आणि वितरणातील अडचणी कमी होतील. पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.

News Title: Pune 28 Km Tunnel Project: Khadakwasla to Fursungi Mega Water Tunnel Work Begins, Route and Details Inside

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now