पुणे हादरलं! लॉजवर मुलीसोबत घडला भयंकर प्रकार

On: February 16, 2024 11:03 AM
---Advertisement---

Pune | विद्येचं माहेर घर असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. कधी कोयता गँगची दहशत तर कधी बंदूकीचा धाक दाखवून लूबाडने. दरम्यान, या बरोबरच पुणे शहरात महिला असुरक्षीत असल्याचं देखील चित्र पहायला मिळत आहे. हल्ली शहरात महिला आत्यचारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील (Pune) एका 17 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांच्या आजारपणासाठी उसने पैसे घेतले होते. आकाश माने आणि त्याची पत्नी पूनम या जोडप्यांकडून 30 हजार रुपये घेतले होते. त्यानंतर या दोघांनी फिर्याद मुलीकडे पैसे मागितले. वारंवार पैसे मागून सुद्धा पैसे न दिल्याने आकाश माने आणि पत्नी पूनम यांनी फिर्याद मुलगी हिला 15 दिवस एका लाॅजवर डांबून ठेवले.

दरम्यान, काही कारणामुळे फिर्याद मुलगी पैसे देऊ शकली नाही. त्यामुळे तिच्यासोबत या जोडप्यांनी हा धक्कादायक प्रकार केला. शिवाय 15 दिवस तिला एका लाॅजमध्ये डांबून ठेवत आकाश मानेनी तिच्यावर आत्याचर करत तिला मारहाण केली. इतकंच नाही तर, त्याने आणि त्याच्या पत्नीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करण्यास भाग पाडून पैसे कमावले.

पुण्यातील लाॅजमधील प्रकार

पुण्यातील के के माॅल जवळ एका लॉजमध्ये हा सगळा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे, त्या सर्व लॉज मालकाची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत. पुण्यातील 3 लॉजमध्ये जाऊन वारंवार तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. घडत असलेल्या प्रकारामुळे पुण्यातील महिला असुरक्षीत असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

पुणे लोकसभेसाठी भाजपची मोठी चाल 

Pune Loksabha भाजपची मोठी चाल; कुणाचा पत्ता कट, कुणाला लागणार लॉटरी? Sunil Deodhar | Murlidhar Mohol

News Title : pune 17 year girl detained for money

महत्त्वाच्या बातम्या-

“अशोक चव्हाण यांचं अभिनंदन करतो त्यांनी काँग्रेस पक्षावर दावा…”

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांचा शिंदे सरकारला गंभीर इशारा

सोनिया गांधी यांनी केली सर्वांत मोठी घोषणा, म्हणाल्या..

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती चिंताजनक; महिलांचा आक्रोश सुरू

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now