पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत- देवेंद्र फडणवीस

On: January 19, 2023 6:33 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईत पंतप्रधानांचे आगमन होईल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) बोलत होते. बोलताना फडणवीसांनी पंतप्रधानाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.

फडणवीसांनी महाराष्ट्र (Maharashtra) आणि मुंबईच्यावतीने मोदींचं स्वागत केलं आहे. सध्या लोकप्रियतेची स्पर्धा सुरु आहे. मोदीजींवर मुंबईकराचं खूप प्रेम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत. अशी स्तुतिसुमने फडणवीसांनी मोदींवर उधळली आहेत.

नरेंद्र मोदी यांनी ज्या योजनांच भूमीपूजन केलं. त्या योजनांच्या भूमीपूजनाला मोदी उपस्थित होते. मेट्रोच्या (Metro) भूमीपूजनाला मोदी उपस्थित होते. त्याच 35 किलोमीटरच्या मेट्रोचं उद्घाटन मोदीजी करत आहेत. असंही बोलताना फडणवीस म्हणाले. यावेळी 6 हजार कोटींचे रस्ते होत असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

यावेळी बोलताना फडणवीसांनी मविआ आघाडीकडे सुद्धा बोट दाखवलं आहे. मुंबईकरांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला नाही. आताच्या सरकारने समुद्रात पाणी टाकण्यासाठी डिस्चार्ज नार्मस तयार करुन घेतलं असल्याची माहिती फडणवीसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now