सर्वसामान्यांना झटका! 1 एप्रिलपासून ‘या’ वस्तू महागणार

On: March 17, 2026 6:29 PM
Price Hike April 2026
---Advertisement---

Price Hike April 2026 | नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि वाहतूक खर्चात झालेली वाढ यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून इलेक्ट्रॉनिक्स तसेच वाहन क्षेत्रातील अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

कच्च्या मालामुळे उत्पादन खर्च वाढला :

अलीकडील काळात प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. या घटकांचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या निर्मितीत केला जात असल्याने उत्पादन खर्च वाढला आहे. याशिवाय जागतिक स्तरावर मालवाहतूक दरांमध्येही वाढ झाली असून ‘फ्रेट’ (Freight) खर्च सुमारे 7 ते 10 टक्क्यांनी वाढल्याचे उद्योग क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले आहे. (Price Hike April 202)

त्याचबरोबर अमेरिकन डॉलर (US Dollar) च्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे दोन टक्क्यांनी कमी झाल्यामुळे आयात होणारा कच्चा माल अधिक महाग झाला आहे. परिणामी कंपन्यांना उत्पादन आणि वितरणाचा खर्च वाढल्याने दरवाढ करण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यापासून अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांच्या किमती साधारण 5 ते 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Price Hike April 2026 | वाहने व घरगुती उपकरणांच्या दरात वाढ :

नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना देखील आता अधिक खर्च करावा लागू शकतो. वाहन उत्पादक कंपन्यांनी 1 एप्रिलपासून दरवाढ करण्याची घोषणा केली आहे. लक्झरी कार बनवणाऱ्या मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आणि ऑडी (Audi) यांनी आपल्या वाहनांच्या किमतीत सुमारे 2 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इतर अनेक कार कंपन्याही 2 ते 3 टक्क्यांपर्यंत दर वाढवण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. (car price increase)

फक्त वाहनच नव्हे तर घरगुती उपकरणांच्या किमतीतही वाढ होणार आहे. टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर (AC) या उपकरणांच्या दरात अंदाजे 5 ते 6 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. याशिवाय शूज आणि सिंथेटिक फायबरपासून तयार होणाऱ्या कपड्यांच्या किमतीतही 9 ते 10 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. घर सजावटीसाठी वापरले जाणारे डेकोरेटिव्ह पेंट देखील महाग होणार असल्याने एप्रिलपासून ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

News title : Price Hike From April 1

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now