“त्या मॅडमने मुद्दाम…”, मृत डॉक्टरबद्दल आरोपी प्रशांत बनकरच्या आईचा गौप्यस्फोट

On: October 25, 2025 12:30 PM
Satara Doctor Case News
---Advertisement---

Prashant Bankar | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन घडामोडी समोर आल्या आहेत. नोटमध्ये नाव असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा मुख्य आरोपी, पोलीस उपनिरीक्षक, अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपीच्या कुटुंबीयांनी मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा करत त्याला गोवण्यात आल्याचे म्हटले आहे.

छळाचा आरोपी प्रशांत बनकरला अटक-

फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर तरुणीने आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशांत बनकर याने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत प्रशांत बनकरला आज पहाटे पुण्यातील एका मित्राच्या फार्महाऊसवरून अटक केली. सातारा पोलिसांनी ही कारवाई केली असून, त्याला पुढील चौकशीसाठी फलटणला आणण्यात आले आहे.

बनकरच्या (Prashant Bankar) अटकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी अनेक पथके तयार केली होती. अखेर प्रयत्नांना यश आले असून, बनकर आता पोलिसांच्या ताब्यात आहे. मृत डॉक्टर फलटणमध्ये जिथे भाड्याने राहत होती, बनकर त्याच घरातील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे.

बनकर कुटुंबीयांचा बचावाचा पवित्रा –

या प्रकरणातील मुख्य आरोपी, पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, ज्याच्यावर डॉक्टर तरुणीने नोटमध्ये ४ वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप (Prashant Bankar) केला आहे, तो अद्याप फरार आहे. बदने हा मूळचा परळीचा असून, त्याचे शेवटचे ज्ञात ठिकाण पंढरपूर असल्याचे समजते. त्यानंतर तो कुठे गेला, याबाबत कोणतीही माहिती नाही. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी अपेक्षा आहे.

दुसरीकडे, अटक करण्यात आलेल्या प्रशांत बनकरच्या आई-वडिलांनी आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. पुढे त्या म्हणाल्या की, “आमचा मुलगा पुण्याला असतो, दिवाळीसाठी घरी आला होता. तो असा नाही. त्या मॅडमने (डॉक्टरने) अन्याय केला आहे, मुद्दाम नाव लिहिले.” वडिलांनी तर, “मी तिला मुलीप्रमाणे सांभाळले, तिने कोणाच्या दबावाखाली हे केले आहे का, याचा तपास शासनाने करावा,” अशी मागणी केली आहे.

 

News Title – prashant bankar mother talks about dr. sampada munde

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now