महिला डॉक्टर प्रकरणी पोलिसांच्या हाती सर्वात मोठा पुरावा

On: October 25, 2025 10:57 AM
Sampada Munde Case
---Advertisement---

Prashant Bankar | सातारा जिल्ह्यातील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली असून, या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. डॉ. मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या  नोटमध्ये मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केलेला प्रशांत बनकर (Prashant Bankar) याला सातारा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने (PSI Gopal Badne) अद्याप फरार आहे.

पुण्यातून आरोपीला बेड्या-

डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस निरीक्षक गोपाल बदने यांनी ४ वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) याने गेल्या चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दोन पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना केली होती.

घटनेला २४ तास उलटल्यानंतर, पोलिसांनी एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी प्रशांत बनकर (Prashant Bankar) हा पुण्यातील (Pune) एका मित्राच्या (Dr. Sampada Munde) फार्महाऊसवर लपून बसला होता. सातारा पोलिसांनी आज पहाटे चार वाजता कारवाई करत त्याला अटक केली. त्याला आता फलटण शहर पोलीस ठाण्यात आणले जाणार आहे.

मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक बदने निलंबित-

या प्रकरणातील मुख्य आरोपी, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आदेशानंतर तातडीने निलंबित करण्यात आले आहे. मात्र, तो अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बदनेवर केवळ डॉ. मुंडे यांच्या नोटमधील आरोपच नाहीत, तर इतरही गंभीर आरोप समोर येत आहेत.

फलटण उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांनी, बदने महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा, असे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी (SP Tushar Doshi) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, सखोल तपास करण्याचे आश्वासन दिले आहे.

News Title – Prashant Bankar arrested in pune

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now