प्रांजल खेवलकरच्या ड्रग्ज-मद्यपान प्रकरणी ससून वैद्यकीय अहवालात मोठा खुलासा, धक्कादायक माहिती उघडकीस

On: July 28, 2025 1:51 PM
Pune Rave Party Case Update
---Advertisement---

Pune Rave Party Case | पुण्यातील खराडी परिसरातील फ्लॅटवर पार पडलेल्या रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याबाबत वैद्यकीय तपासणीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या प्राथमिक अहवालानुसार, प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) आणि श्रीपाद यादव (Shripad yadav) यांनी मद्यपान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ड्रग्सचा वापर झाला होता का, हे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. (Pune Rave Party Case)

पोलिसांनी शनिवारी (27 जुलै) पहाटे या पार्टीवर छापा टाकून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर आणि सहा इतरांना अटक केली होती. त्यानंतर सातही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

रोहिणी खडसे यांची आयुक्तांशी नियोजित भेट रद्द :

प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेता, रोहिणी खडसे, रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट अचानक रद्द करण्यात आली. पोलीस आयुक्तालयात पोहोचलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही प्रवेश नाकारण्यात आला. रोहिणी खडसे यांच्याकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

या बैठकीत पतीवर झालेल्या कारवाईबाबत चर्चा होणार असल्याची माहिती होती. मात्र रोहिणी खडसे वेळेवर पोहोचू न शकल्यामुळे भेट रद्द झाली, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. (Pune Rave Party Case)

Pune Rave Party Case | फ्लॅटचे सीसीटीव्ही फुटेज आणि जुन्या पार्टीची चौकशी :

पुणे पोलिसांच्या माहितीनुसार, ही पार्टी 26 जुलैच्या रात्री सुरू झाली होती. मात्र, 25 जुलैलाही अशीच पार्टी झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. प्रांजल खेवलकर यांनी चार दिवसांसाठी हा फ्लॅट बुक केला होता. त्यामुळे पोलिसांकडून 25 जुलैच्या रात्रीही नेमकं काय घडलं, याचा तपास केला जाणार आहे. त्यासाठी फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात येणार आहे.

या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सात आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

प्रांजल मनिष खेवलकर (41)

निखिल जेठानंद पोपटाणी (35)

समीर फकीर महमंद सय्यद (41)

सचिन सोनाजी भोंबे (42)

श्रीपाद मोहन यादव (27)

ईशा देवज्योत सिंग (23)

प्राची गोपाल शर्मा (22)

News Title: Pranjal Khewalkar Consumed Alcohol in Pune Rave Party; FSL Report to Confirm Drug Use

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now