‘बीडचं पार्सल परत पाठवू’; प्रणिती शिंदेंचा पहिला हल्ला

On: March 25, 2024 9:20 PM
Praniti Shinde
---Advertisement---

Praniti Shinde | आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. अनेक दिवसांपासून सोलापूर लोकसभा मतदारंसंघातून भाजप कोणाला उमेदवारी देईल हे पाहणं गरजेचं होतं. सोलापूर मतदारसंघामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राम सातपुतेंना उमेदवारी मिळाल्यानं ट्वीट करत त्यांचं स्वागत केलं आहे.

प्रणिती शिंदे ट्वीट

“सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं स्वागत करते”, असं ट्वीट प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केलं. त्यानंतर त्यांनी “सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते,” अशा शब्दात प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ट्वीट करत त्यांनी सातपुते यांना टोला लगावला आहे.

“पुढील 40 दिवसांमध्ये लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे यांचं भान राखून, लोकशाहीचा आपण आदर करत, एकमेकांची लढाई लढत एकमेकांविरोधात उभे राहू आणि समाजामध्ये फूट न पडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असं प्रणिती शिंदे म्हणाल्या असून त्यांनी राम सातपुते यांना आव्हान दिलं आहे. प्रणिती शिंदे यांच्या ट्वीटने राजकारणामध्ये राजकीय धुळवड सुरू असल्याचं चित्र सोलापूरमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रणिती शिंदे यांच्या ट्वीटवर सातपुते यांचा समाचार

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्वीटवर प्रणिती शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच काही नेटकऱ्यांनी राम सातपुते यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘चला कमाला लागा’, ‘बीडचं पार्सल बीडला पाठवूया’, अशा पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

कोण आहेत राम सातपुते?

राम सातपुते हे माळशिरसचे भाजप आमदार आहेत. त्यांना आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या युवा मोर्च्याचे ते उपाध्यक्ष आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तिय असल्याचं समजतंय. आता त्यांची थेट लढत प्रणिती शिंदे यांच्यासोबत होणार आहे.

News title – Praniti Shinde Tweet On Ram Satpute

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now