अश्लील कमेंट भोवली! प्रणित मोरे आणि सेजल पवारची 8 तास कसून चौकशी, मोबाईल केले जप्त

On: June 19, 2026 10:28 AM
Sejal Pawar pranit more
---Advertisement---

Praneet More Sejal Pawar | कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या अडचणीत दिवसागणिक मोठी वाढ होत आहे. मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरील आक्षेपार्ह जोक आणि ३७० रुपयांच्या बिर्याणीचा संदर्भ असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण आता पूर्णपणे कायदेशीर कचाट्यात सापडले आहे. याप्रकरणी प्रणीत मोरे आणि एमबीबीएसची विद्यार्थिनी सेजल पवार बुधवारी महाराष्ट्र सायबर सेलसमोर हजर झाले होते.

प्रणीत मोरे आणि सेजल पवार ८ तास चौकशी

महाराष्ट्र सायबर सेलच्या तपास पथकाने प्रणीत आणि सेजल या दोघांची तब्बल ८ तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी केली. या चौकशीत प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. दोन्ही आरोपींना या फेरीच्या चौकशीनंतर सोडण्यात आले असले, तरी तपासाची व्याप्ती पाहता पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहण्यासाठी त्यांना नवीन समन्स जारी करण्यात येणार आहे.

प्रणीत मोरे आणि सेजल पवार यांनी मानली चूक

सायबर सेलच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोघांनीही आपली चूक मान्य केली असून तीव्र खेद व्यक्त केला आहे. “व्हायरल झालेला व्हिडिओ हा माझ्या एका स्टँड-अप कॉमेडी शोचा भाग होता, जो सुमारे तीन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आला होता. हे प्रकरण इतके गंभीर कायदेशीर वळण घेईल आणि लोकांच्या भावना इतक्या तीव्रतेने दुखावतील, याची मला अजिबात कल्पना नव्हती.” प्रणीतने चौकशीदरम्यान अधिकाऱ्यांसमोर वारंवार माफी मागितली आहे.

चौकशीदरम्यान सेजल पवार हिने देखील कार्यक्रमात वापरण्यात आलेली भाषा अत्यंत अयोग्य आणि आक्षेपार्ह होती हे कबूल केले. घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल तिने तीव्र दुःख व्यक्त केले असून, या संपूर्ण घटनेमुळे आपल्याला अत्यंत लाज वाटत असल्याचे तपास अधिकाऱ्यांना सांगितले.

मोबाईल जप्त आणि डिजिटल फॉरेन्सिक तपास

तपासात कोणतीही अडचण येऊ नये आणि ठोस पुरावे गोळा करता यावेत यासाठी सायबर अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. प्रणीत मोरेचा मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्याच्या इतर वेगवेगळ्या कॉमेडी शोज्चे व्हिडिओ देखील जप्त करण्यात आले आहेत. सायबर सेलने सेजल पवार हिच्याही मोबाईल फोनमधील संपूर्ण डेटा मिळवला असून, तो पुढील वैज्ञानिक विश्लेषणासाठी फॉरेन्सिक तपासासाठी (Forensic Investigation) सुरक्षित ठेवला आहे.

पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यात असून, जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढच्या आठवड्यात पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे.

News Title: Praneet More Sejal Pawar Comedy Video Controversy Cyber Cell investigation 8 hours

Join WhatsApp Group

Join Now