Prakash Ambedkar | उद्धव ठाकरेंबाबत प्रकाश आंबेडकरांचा मोठा गौप्यस्फोट!

On: December 25, 2023 6:56 PM
Prakash Ambedkar
---Advertisement---

Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय चर्चा झाली होती, याबाबत Prakash Ambedkar यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Prakash Ambedkar यांचा मोठा गौप्यस्फोट

लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार असं मोघम ठरलं होतं. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.

“आमच्या दोघात एक गोष्ट ठरली’

उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमचं ठरलं आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.

काहीच झालं नाही आणि सर्वांनी वेगळं लढायचं ठरलं तर राजकीय पक्ष म्हणून आम्हालाही लढावं लागले. आम्हीही 48 जागा लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

“प्रकाश आंबेडकरांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू”

प्रकाश आंबेडकर यांना झुलवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आंबेडकर महाविकास आघाडीला जागा दाखवतील. आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं, त्यांचं रेड कार्पेट टाकून स्वागत करू, असं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Aishwarya Rai च्या ‘या’ गोष्टीमुळे संपूर्ण बच्चन कुटुंब अडचणीत!

IND vs SA | दिग्गजांना जमलं नाही ते रोहित शर्मा करून दाखवणार?; भारताला इतिहास रचण्याची संधी

Ajit Pawar | ‘अमोल कोल्हेंना पाडणार म्हणजे पाडणारच’; अजित पवारांची गर्जना

आलिया-रणबीरचं चाहत्यांना मोठं सरप्राईज, लेक Raha ची झलक दाखवली, पाहा व्हिडीओ

Weather Update | ‘या’ जिल्ह्यात थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now