“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता, आज तो शरद पवारांचा बाप झालाय”

On: February 27, 2024 7:45 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

परभणी | इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही. काहींच्या वाट्याला ही संधी येते. सहा महिन्यांपूर्वी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना कोणीही ओळखत नव्हतं. तो सामान्यातला सामान्य व्यक्ती होता. पण आज तो शरद पवारांचा बाप झालाय, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं आहे.

“मनोज जरांगे कोणाला माहित नव्हता”

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) परभणी येथे ओबीसीच्या एल्गार मेळाव्यासाठी आले होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांचा जरांगेंना सल्ला

मराठा आरक्षण मिळवायचं असेल, या आंदोलनाला यश मिळवायचं असेल तर त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल. अन्यथा त्यांच्या आंदोलनाचा अण्णासाहेब पाटील होऊ शकतो, असा सल्ला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षामध्ये न जाता अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली पाहिजे. त्यांनी कोणत्याही पक्षाचा तिकीट घेऊ नये कारण त्या पक्षाची मर्यादा असते, त्यांची ध्येयधोरणे असतात, असं प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आपल्या आंदोलनात यश मिळवायचं असेल तसेच आंदोलन कायम ठेवायचे असेल तर त्यांनी निवडणूक रिंगणात उतरलं पाहिजे. अन्यथा निवडणुकीनंतर कोण जरांगे पाटील अशी चर्चा सुरू होऊ शकते, असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन वास्तववादी आहे. 40 एकर जमीन असलेला मराठा आज दोन आणि तीन एकर जमिनीवर आलेला आहे. दुसरीकडे सरकार कृषी मालाला आधारभूत किंमतही देत नाही. त्यामुळे मराठा समाजाची दयनीय अवस्था आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, असं त्यांनी म्हटलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

जरांगे विरूद्ध फडणवीस वाद आणखी वाढणार?; जरांगेंचा पुन्हा गंभीर इशारा

“जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत”

वसंत मोरे शरद पवार गटात जाणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिकला ईडीचा मोठा झटका!

बीट खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे वाचून थक्क व्हाल!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now