Prajakta Mali | मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच साधेपणा, सौंदर्य आणि सकारात्मक विचारांसाठी ओळखली जाते. वयाच्या 36 व्या वर्षीही अविवाहित असलेली प्राजक्ता समाजाच्या अपेक्षा किंवा दबावाला फारसं महत्त्व न देता आत्मविश्वासाने आपलं आयुष्य जगताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने प्रेम आणि नात्यांविषयी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
प्रेमाबद्दलचा वेगळा दृष्टिकोन :
प्राजक्ताने सांगितलं की, प्रेम हा विषय जितका आकर्षक आहे, तितकाच तो गुंतागुंतीचाही आहे. पहिल्याच नजरेत होणाऱ्या भावना म्हणजे प्रेम नसून ते केवळ आकर्षण असतं, असं तिचं मत आहे. तिच्या मते, खऱ्या अर्थाने प्रेम तेव्हाच जन्माला येतं, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये खोल आत्मिक आणि वैचारिक नातं तयार होतं. त्यामुळे ती नात्यांकडे अधिक प्रगल्भ दृष्टीने पाहते. (Prajakta Mali Love)
तिने एका तत्त्वज्ञानाचा उल्लेख करत सांगितलं की, काही विचारसरणीनुसार मागील जन्मातील नातेसंबंधांचा प्रभाव या जन्मातील जोडीदाराच्या नात्यावर पडतो. तिच्या वाचनामुळे आणि अनुभवांमुळे प्रेमाची संकल्पनाच बदलली असल्याचं तिने स्पष्ट केलं. नात्यांमध्ये केवळ भावना नव्हे, तर समजूतदारपणा, विश्वास आणि आत्मिक जोड महत्त्वाची असल्याचं तिचं मत आहे.
Prajakta Mali | चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव :
प्राजक्ताच्या या विचारांनी सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक चाहत्यांनी तिच्या परखड आणि सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं आहे.
तसेच प्रेमाकडे केवळ रोमँटिक नजरेने न पाहता त्यामागील खोल अर्थ अधोरेखित करणारी तिची भूमिका अनेक तरुणांना विचार करायला लावणारी ठरत आहे. अभिनयासोबतच विचारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकणारी प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.






