बॉलिवूडमध्ये लपलंय प्राजक्ता माळीचं प्रेम, स्वतः खुलासा करत दिली कबुली

On: March 27, 2025 4:20 PM
prajakta mali
---Advertisement---

Prajakta Mali | मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हिने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या चित्रपटांइतकीच चर्चा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही होत असते. अनेकदा तिच्या लग्नाविषयी आणि प्रेमाविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. मुलाखतींमध्येही तिला नेहमीच “लग्न कधी?” किंवा “तुला कसा जोडीदार हवा आहे?” असे प्रश्न विचारले जातात.

काय म्हणाली प्राजक्ता?

याच अनुषंगाने प्राजक्ताने एका मुलाखतीत आपल्या ‘क्रश’ बाबत खुलेपणाने सांगितले होते. तिचा हा क्रश बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. प्राजक्ताने ज्या अभिनेत्यावर प्रेम व्यक्त केलं आहे, तो दुसरा-तिसरा कोणी नसून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आहे. रणबीरकडे पाहून तिला नेहमीच प्रेमात असल्यासारखं वाटतं, असंही ती म्हणाली होती. त्याशिवाय मराठी अभिनेता वैभव तत्ववादी हाही तिला आवडतो, हेही तिने स्पष्ट केलं. मात्र “रणबीर हेच माझं प्रेम आहे” असं म्हणत तिने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या.

रणबीरचं आयुष्य आणि विचार प्राजक्ताला का वाटतो खास?

प्राजक्ता रणबीर कपूरच्या व्यक्तिमत्त्वाने फार प्रभावित असल्याचं तिने स्पष्ट केलं. ती म्हणाली, “रणबीर सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नाही. तो त्याचं वैयक्तिक आयुष्य जास्त शेअर करत नाही. त्याचा हा गुण मला फार भावतो. एका मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, जर मी माझं खाजगी आयुष्य सार्वजनिक केलं, तर त्याचा परिणाम माझ्या भूमिकांवर होईल.” हा विचार तिला इतका आवडला की त्यातूनच तिने रणबीरबद्दलचा आदर व्यक्त केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

तिच्या मते, कलाकार म्हणून लोकांनी आपली खरी ओळख विसरावी, हेच उत्तम अभिनयाचं लक्षण आहे. रणबीरचा हा दृष्टिकोन, त्याचं व्यक्तिमत्त्व आणि समजूतदारपणा, हे सर्व प्राजक्ताला आकर्षित करतं. त्यामुळेच तिने “मी कायम त्याच्या प्रेमात असते” असंही मजेशीरपणे सांगितलं.

याशिवाय, प्राजक्ताच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेते नानी आणि जयम रवी यांचाही समावेश आहे. सध्या ती ‘हास्य जत्रा’सारख्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून, मराठी चित्रपटांतूनही तिची चमक कायम आहे.

 Title: Prajakta Mali Reveals Her Crush on Ranbir Kapoor

 

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now