Rashmi Thackeray | ‘रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात’; भास्कर जाधवांकडून कौतुक, रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

On: January 24, 2024 3:30 PM
Rashmi Thackeray
---Advertisement---

Rashmi Thackeray | नाशिकमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाची सभा पार पाडली. या सभेमध्ये आमदार भास्कर जाधव यांनी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना बाहेर पडण्यासाठी भावनिक साद घातली. यावेळी भास्कर जाधवांचं भाषण ऐकून रश्मी ठाकरेंना रडू कोसळलं. यावेळी त्या भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

राश्मी ठाकरेंना अश्रू अनावर

उद्धव ठाकरे यांना आवडणार नाही पण आज मी रश्मी ठाकरेंवर (Rashmi Thackeray) भाषण करणार आहे. गेले अनेक दिवस आपल्या माणसांवर अन्याय होत आहे. त्या चंद्राप्रमाणे शांत आहेत. त्या समोर बसलेल्या असताना मला त्यांच्या रुपाने माँ साहेबांचा भास होतोय, असं भास्कर जाधव म्हणाले. यानंतर रश्मी ठाकरेसुद्धा (Rashmi Thackeray) भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या.

Rashmi Thackeray | “रश्मी ठाकरे यांच्या रुपात माँसाहेब दिसतात”

अनेकवेळा शिवसेनेचे अनेक नेते उद्धव ठाकरे यांचं जाहीर सभांमधून कौतुक करताना दिसतात. पण भास्कर जाधव आपलं भाषण उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंवर केलं.

शिवसेनेच्या सभांवेळी व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रुपाने धगधगतं अग्रिकुंड असायचं. तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मी वहिनींना संयमी, शांतपणे बघितलं, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.

उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तरीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. अनेक संकट आलीत पण माँसाहेबांसारख्याच रश्मी ठाकरे लढत राहिल्या असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

पूर्व विदर्भाची माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिलीये. तेथील महिला मला भेटल्या. त्यांनी मला सांगितलं, वहिनींना तुम्ही विनंती करा, वहिनी प्लीज तुम्ही बाहेर पडा. मी देखील हेच सांगतोय, आपल्या माणसांवर वार झालाय, त्यांच्याशी गद्दारी झालीये. आता वहिनी बाहेर पडण्याची वेळ आहे, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mukesh Ambani | उद्योगपती मुकेश अंबानी देशवासीयांना देणार सर्वांत मोठं गिफ्ट!

Sania Mirza आणि मोहम्मद शमी लग्नबंधनात अडकणार?; चर्चांना उधाण

Ayodhya Ram Temple | अयोध्येत रामलल्लानंतर सीता आणि हनुमानही विराजणार; ट्रस्टचा मोठा प्लॅन आला समोर

Bigg Boss 17 | विकी जैननंतर टॉप 5 मधून ‘या’ तगड्या स्पर्धकाचाही पत्ता कट होणार?

Ramlalla Jewellery | सोन्या-चांदीची खेळणी ते हीरे-मोत्यांचा शृंगार; रामलल्लाच्या दागिन्यांची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now