भाजप नेत्याच्या पापाचा घडा फुटला; अत्याचाराचा गुन्हा दाखल

On: July 22, 2025 10:28 AM
Raosaheb Danve
---Advertisement---

Praful Lodha Rape Case | राज्यात आधीच चर्चेत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेल्या प्रफुल लोढाच्या अडचणींना आता नवे वळण मिळाले आहे. नाशिक आणि मुंबईनंतर आता पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात देखील लोढाविरुद्ध बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Praful Lodha Rape Case)

ही तक्रार ३६ वर्षीय महिलेने १७ जुलै रोजी केली असून, तिने दिलेल्या जबाबात प्रफुल लोढावर नोकरीच्या आमिषावरून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची माहिती पोलिसांकडून इतक्या दिवसांपासून गुप्त ठेवण्यात आल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील संशय निर्माण झाला आहे. (Praful Lodha Rape Case)

काय आहे प्रकरण? :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूडमध्ये राहणाऱ्या महिलेला लोढाने तिच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. याच बहाण्याने २७ मे २०२५ रोजी रात्री ८ वाजता बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये तिला बोलावून घेतले. तिथे त्याने थेट “पतीला नोकरी हवी असेल तर तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे,” अशी मागणी केली. पीडित महिलेने विरोध केला असता, “तुझी नोकरी देखील घालवीन,” अशी धमकी देत लोढाने तिच्यावर जबरदस्ती केली, असा आरोप तिने तक्रारीत केला आहे. (Praful Lodha Rape Case)

सध्या प्रफुल लोढा मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. त्याच्यावर आधीच हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा गुन्हा दाखल असून, आता पुण्यातही बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आल्यानं त्याच्यावर आणखी कलम ३७६ आणि धमकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस लवकरच मुंबई पोलिसांकडून त्याचा ताबा घेण्याची शक्यता आहे, जेणेकरून पुण्यातील प्रकरणात अधिक तपास करता येईल.

Praful Lodha Rape Case | पोलिसांच्या गुप्ततेवर संशय :

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, १७ जुलैला गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलीस यंत्रणेकडून याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली. यामुळे नागरिक आणि राजकीय वर्तुळात पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे. इतका गंभीर गुन्हा असूनही ही माहिती उशिरा उघड होणं, हे गंभीर प्रश्न निर्माण करत आहे.

प्रफुल लोढा याला भाजप नेते गिरीश महाजन यांचा विश्वासू मानलं जातं. हनी ट्रॅप प्रकरणात त्याने महिलांचा वापर करून विविध प्रभावशाली व्यक्तींना जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाईसह राजकीयही दडपण वाढतंय, कारण त्याच्या संपर्कांची यादी मोठी आहे, असं समजलं जात आहे.

News Title: Praful Lodha Accused Again: New Rape Case Filed in Pune Amid Honeytrap Scandal

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now