Salaar नं प्रदर्शनाआधीच मारली बाजी, शाहरुखच्या Dunki ला ‘या’ गोष्टीत टाकलं मागे!

On: December 22, 2023 12:30 PM
Salaar Dunki
---Advertisement---

Mumbai | साऊथचा सुपरस्टार प्रभासची Salaar तसेच किंग खान शाहरुखच्या Dunki या सिनेमांची बॉक्स ऑफीसवर धडक दिली आहे. दोन्ही अभिनेत्यांचे फॅन मोठ्या संख्येनं असल्यानं आणि जगभरात दोघांचा चाहता वर्ग असल्यानं दोन्ही सिनेमांच्या चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. दोन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे असे एकाच दिवशी प्रदर्शित होतात तेव्हा कोण बाजी मारणार याची चर्चा नेहमीच रंगते. (Entertainment News)

प्रभासचा सालार की शाहरुखचा डंकी???

सध्याच्या घडीला सुद्धा कोण बाजी मारणार?, याची चर्चा रंगलेली पहायला मिळत आहे. South Superstar प्रभासच्या (Prabhas) चाहत्यांचं म्हणणं आहे की सालार शाहरुखच्या डंकीवर सहज मात करेल, तर शाहरुखच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांनी बॉक्स ऑफीसवर डंकीच बाजी मारणार असल्याचा दावा केला आहे.

दोन्ही सिनेमांमध्ये बॉक्स ऑफीसवर (Box Office Collection) पकड मिळवण्यासाठी पहिल्या दिवसापासूनच धडपड चालू झाली आहे, याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभासच्या सालारनं पहिला डाव जिंकल्याचं पहायला मिळत आहे. शाहरुखच्या डंकीचं पारडं जड जाईल, असं मानलं जात असलेल्या गोष्टीमध्येच सालारनं बाजी मारली आहे. यासंदर्भात एक अधिकृत आकडेवारी समोर आली असून ती प्रभासच्या चाहत्यांना मोठा आनंद देणारी आहे.

प्रभासच्या सालारनं नेमकी कशात मारली बाजी?

कोणताही सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी तो अॅडव्हान्स बुकिंगसाठी खुला होतो. अॅडव्हान्स बुकिंग (Advance Booking) किती होतं?, यावरुनही हा सिनेमा चालणार की नाही याचा अंदाज बांधला जातो. दोन सिनेमे एकत्र प्रदर्शित झाल्यावर कोणता जास्त चालणार हे सुद्धा अनेकदा या सिनेमांना मिळालेल्या एडव्हान्स बुकिंगवरुनच कळतं. आता याच गोष्टीत सालारनं डंकीला मात दिली आहे.

प्रदर्शित होण्याच्या आधीच सालारच्या (Salaar Release) अॅडव्हान्स बुकींगनं नवं रेकॉर्ड केलं आहे. तब्बल 48.94 कोटी रुपयांची तिकीटं अॅडव्हान्स विकली गेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात आगाऊ तिकीट विकली गेल्यानं लोकांमध्ये सालार पाहण्याची क्रेझ असल्याचे संकेत मानले जात आहेत.

दुसरीकडे शाहरुखच्या डंकीला (Dunki Release) मात्र हवी तेवढी अॅडव्हान्स बुकिंग मिळालेली दिसत नाही. डंकीची फक्त 30 कोटी रुपयांची तिकीटं आगाऊ विकली गेली होती. मात्र यावरच सगळं ठरत नाही. आता कुठे सिनेमे रिलीज झाले आहेत. आता पहिल्या दिवशी दोन्ही सिनेमांची कमाई कशी राहते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तसेच टोटल कमाईत कोण कुणाला मात देतं याकडेही बॉलिवूडचं लक्ष लागलं आहे.

News Title: prabhas salaar and Shah Rukh Khan Dunki earnings

महत्त्वाच्या बातम्या-

LPG Gas Price | सर्वसामान्यांसाठी मोठी आनंदाची बातमी, गॅस झाला ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त!

CoronaVirus | जीव घेतोय नवा कोरोना, आतापर्यंत एवढ्या लोकांनी घेतला जगाचा निरोप!

सगळ्यांसमोर Aishwarya Rai ने अभिषेकसोबत केलं असं काही की…,व्हिडीओ होतोय व्हायरल

Sanju Samson | संजू सॅमसननं करुन दाखवलं… खूप दिवसांनंतर मिळालेल्या संधीचं केलं सोनं!

‘MS Dhoni नं ‘भारताच्या कायरन पोलार्ड’ला दिला होता शब्द; “कोणीच खरेदी केलं नाही, तर मी तुला खरेदी करणार!”

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now