Post Office Scheme | आजच्या अस्थिर बाजारपेठेत बहुतांश गुंतवणूकदारांना सुरक्षितता आणि चांगला परतावा हवे असतात. अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या टाईम डिपॉझिट योजना (Post Office Time Deposit Scheme) हा एक उत्तम पर्याय ठरतो. या योजनेत गुंतवणूकदारांना निश्चित कालावधीसाठी सुरक्षित व्याज मिळते आणि दीर्घकाळ गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळू शकतो.
जाणून घेऊयात या योजनेचे फायदे :
– किमान 1,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.
– कालावधी : 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष किंवा 5 वर्ष.
– जितका जास्त कालावधी तितका जास्त व्याजदर.
– पाच वर्षांच्या गुंतवणुकीवर सध्या 7.5% पर्यंत व्याज मिळते.
– कर लाभ (Tax Benefit): इन्कम टॅक्स कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीवर करसवलत मिळते. (Post Office Scheme)
Post Office Scheme | व्याजातून 2 लाखांचा फायदा कसा? :
जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांसाठी ₹5 लाखांची गुंतवणूक केली तर त्याला 7.5% व्याजदराने एकूण सुमारे ₹2,24,974 केवळ व्याजाच्या रूपात मिळतात. म्हणजेच गुंतवणूकदाराला पाच वर्षांत फक्त व्याजातूनच 2 लाखांहून अधिक रक्कम मिळते. पाच वर्षांनंतर गुंतवणूकदाराच्या हातात मूळ रक्कम आणि व्याज मिळून ₹7,24,974 इतकी एकूण रक्कम परत येते.
कालावधीनुसार व्याजदर :
1 वर्ष: 6.9% व्याज
2 ते 3 वर्षे: 7% व्याज
5 वर्षे: 7.5% व्याज
पोस्ट ऑफिस योजना केंद्र सरकारकडून हमी दिलेल्या असल्याने पूर्णतः सुरक्षित आहेत. विशेष म्हणजे 5 वर्षांची मुदत निवडल्यास केवळ जास्त व्याज मिळत नाही तर त्याचबरोबर करसवलतीचाही लाभ होतो. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीबरोबरच करबचत आणि आकर्षक परतावा मिळवण्याची संधी मिळते.






