प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनं गुपचुप उरकला साखरपुडा; फोटो आले समोर

On: February 17, 2024 1:50 PM
Pooja Sawant Engagement
---Advertisement---

Pooja Sawant Engagement | बॉलिवूड प्रमाणेच मराठी इंडस्ट्रीमध्येही सध्या लग्नाचा ट्रेंड सुरू आहे. मराठीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीनेही गुपचुप साखरपुडा उरकला आहे. याचे फोटो देखील समोर आले आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर पूजा सावंत (Pooja Sawant Engagement ) आहे. मराठी सिनेसृष्टीबरोबरच हिंदीतही तिने आपली वेगळी ओळख बनवली आहे.

‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून पूजाने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख पूजाची आहे. तिने आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

पूजा सावंतने उरकला साखरपुडा-

पूजाने आपल्या इन्स्टाग्रामवर ‘We are engaged’ असं म्हणत एक पोस्ट केली आहे. यासोबतच तिने फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये पूजा एका व्यक्तीसोबत दिसून येत आहे. दोघेही आपल्या बोटातील अंगठी या फोटोमध्ये दाखवताना दिसून येत आहेत.

“माझ्या आयुष्यातील एका नवीन अध्यायासाठी मी सज्ज झाले आहे. ही प्रेमाची जादू असून आम्ही आमचा सुंदर प्रवास सुरु करत आहोत. We are engaged”, अशा आशयाची पोस्ट पूजाने (Pooja Sawant Engagement ) केली आहे. या सर्व फोटो पोस्टमध्ये पूजा अतिशय सुंदर दिसत आहे. तिने सिद्धेश चव्हाण सोबत साखरपुडा केला आहे.

पूजा सावंतवर शुभेच्छांचा वर्षाव-

पूजाच्या या पोस्टवर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. यावर अनेक कमेंट उमटत आहेत. हेमंत ढोमे, सायली संजीव, तेजस्विनी पंडित, पुष्कर जोग यांसह अनेक कलाकारांनी पूजाला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘दगडी चाळ’, ‘चपाछपी’, ‘भेटली तू पुन्हा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या पूजाने अखेर आपला जीवनसाथी निवडला आहे.

पूजा (Pooja Sawant Engagement ) आणि सिद्धेश दोघेही फोटोमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत. पूजाने हिरव्या रंगाची साडी, नथ, दागिने असा सुंदर लूक केला होता. तर सिद्धेशने कुर्ता आणि धोती परिधान केली होती. यानंतर दोघांनी पांढरा पोशाखही घातला होता. तिच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

News Title :  Pooja Sawant Engagement

महत्त्वाच्या बातम्या-

जॉनी सीन्सला स्वत: रणवीरने केली होती ‘ही’ विनंती

शाहरूख खानच्या चाहत्यांना धक्का, मोठा निर्णय घेणार

बारामतीत अजित पवारांचा उमेदवार ठरला?; एका फोटोमुळे मोठं गुपित झालं उघड

‘बाबांना घरातील महिलांनी..’; अमिताभ बच्चन यांच्या लेकीचा मोठा खुलासा

मेधा कुलकर्णींच्या राज्यसभा उमेदवारीनं पुणे लोकसभेची गणितं बदलली!

Join WhatsApp Group

Join Now