PNB Alert | देशातील सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या Punjab National Bank (PNB) ने आपल्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे. ज्या खातेदारांनी बँकेच्या नियमांनुसार केवायसी अपडेट केलेले नाही, त्यांची खाती 16 एप्रिल 2026 नंतर फ्रीज केली जाऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत तसेच कोणतेही ऑनलाइन व्यवहार करता येणार नाहीत.
बँकेने सांगितले आहे की, नियमांचे पालन न करणाऱ्या खात्यांवर ही कारवाई केली जाईल. त्यामुळे वेळेत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक ग्राहकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. (Punjab National Bank Alert)
KYC अपडेट नसल्यास खाते होईल निष्क्रिय :
बँक खात्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची अट म्हणजे केवायसी (Know Your Customer) प्रक्रिया. Reserve Bank of India च्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रत्येक ग्राहकाने ठराविक कालावधीनंतर आपली ओळख आणि पत्त्याशी संबंधित कागदपत्रे बँकेत अपडेट करणे आवश्यक असते.
ज्या खातेदारांनी अनेक वर्षांपासून आपली माहिती अपडेट केलेली नाही, अशा खात्यांना ‘इनऑपरेटिव्ह’ किंवा निष्क्रिय केले जाऊ शकते. त्यामुळे खाते फ्रीज झाल्यास ग्राहकांना पैसे काढणे, UPI किंवा नेट बँकिंग व्यवहार करणे शक्य होणार नाही.
PNB Alert | संकट टाळण्यासाठी तातडीने करा KYC अपडेट :
ग्राहकांनी 16 एप्रिलपूर्वी आपले केवायसी अपडेट करून ही समस्या टाळू शकतात. यासाठी जवळच्या PNB शाखेत जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साइज फोटो सादर करून माहिती अपडेट करता येते.
याशिवाय, काही प्रकरणांमध्ये ऑनलाइन सुविधेद्वारेही केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येते. त्यामुळे ग्राहकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर आपले खाते अपडेट करावे, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.






