पीएमपीने पुणेकरांना दिली गुड न्यूज; ‘या’ पर्यटन स्थळांसाठी बससेवा सुरू

On: April 1, 2025 10:43 AM
Bus
---Advertisement---

PMPML Pune | उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पुणे (Pune) शहर आणि आसपासच्या परिसरात फिरण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटक आणि नागरिकांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (Pune Mahanagar Parivahan Mahamandal – PMPML) एक विशेष सुविधा सुरू केली आहे. ‘पुणे दर्शन’ आणि परिसरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पीएमपीएमएलतर्फे १० विशेष मार्गांवर वातानुकूलित बस सेवा (Air-conditioned Bus Service) सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे उन्हाळ्यातही पर्यटनाचा गारगार अनुभव घेता येणार आहे.

बस सेवा, तिकीट दर आणि बुकिंगची माहिती

पीएमपीएमएलची ही विशेष पर्यटन बस सेवा प्रत्येक आठवड्याच्या शेवटी, म्हणजेच शनिवारी व रविवारी, तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उपलब्ध असेल. यासाठी पीएमपीएमएलच्या ताफ्यातील आरामदायी, स्मार्ट वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस (Smart AC Electric Buses) वापरण्यात येणार आहेत. या सेवेचे प्रति व्यक्ती तिकीट दर ५०० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या बसमध्ये प्रवाशांना स्थळांची माहिती देण्यासाठी एका गाईडची (Guide) नेमणूकही केलेली असेल, ज्यामुळे पर्यटकांना स्थळांची माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल.

या विशेष बस सेवेचे बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना डेक्कन जिमखाना (Deccan Gymkhana), पुणे स्टेशन (Pune Station), स्वारगेट (Swargate), कात्रज (Katraj), हडपसर गाडीतळ (Hadapsar Gadital), भोसरी बसस्थानक (Bhosari Bus Stand), निगडी (Nigdi) आणि मनपा भवन (Manapa Bhavan) येथील पास केंद्रांवर संपर्क साधता येईल. या केंद्रांवर सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत बुकिंग करता येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे; बसच्या पूर्ण क्षमतेनुसार (३३ प्रवासी) ग्रुप तिकीट बुकिंग केल्यास पाच प्रवाशांच्या तिकीट दरात १०० टक्के सूट मिळेल. तसेच, बुकिंग केलेल्या प्रवाशाला प्रवासाच्या दिवशी आपल्या राहत्या घरापासून बस सुटण्याच्या ठिकाणापर्यंत येण्या-जाण्यासाठी त्याच तिकीटावर पीएमपीएमएलच्या इतर मार्गांवरील बसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

पुणे आणि परिसरातील पर्यटन स्थळांसाठी १० विशेष मार्ग

पीएमपीएमएलने पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांतील पर्यटन स्थळे समाविष्ट करणारे एकूण १० मार्ग निश्चित केले आहेत. हे मार्ग आणि त्यावरील प्रमुख स्थळे खालीलप्रमाणे:

हडपसर/स्वारगेटहून: इस्कॉन मंदिर (ISKCON Mandir) कोंढवा, श्रीक्षेत्र कानिफनाथ गड, मोरगाव गणपती, जेजुरी दर्शन, सासवड.
हडपसर/स्वारगेटहून: सासवड, सोपानकाका मंदिर, संगमेश्वर मंदिर, नारायणपूर दत्त मंदिर, नारायणेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र म्हस्कोबा मंदिर कोडीत.
पुणे स्टेशन/डेक्कन/स्वारगेटहून: शिवसृष्टी आंबेगाव, स्वामीनारायण मंदिर, कोंढणपूर तुकाईमाता मंदिर, बनेश्वर मंदिर व अभयारण्य, बालाजी मंदिर केतकावळे.
पुणे स्टेशन/डेक्कनहून: पु. ल. देशपांडे उद्यान, खारावडे म्हसोबा देवस्थान, निळकंठेश्वर पायथा, झुपुर्झा संग्रहालय, घोटावडे फाटा.
पुणे स्टेशन/डेक्कनहून: खडकवासला धरण, सिंहगड पायथा, गोकूळ फ्लॉवर पार्क गोळेवाडी, पानशेत धरण.
पुणे स्टेशन/स्वारगेट/हडपसरहून: रामदरा, थेऊर गणपती, प्रयागधाम.
पुणे स्टेशन/स्वारगेटहून: वाघेश्वर मंदिर वाघोली, वाडेबोल्हाई मंदिर, तुळापूर त्रिवेणी संगम, छत्रपती संभाजी महाराज समाधी वढू बु., रांजणगाव गणपती, भीमा कोरेगाव विजयस्तंभ.
पुणे स्टेशन/स्वारगेटहून: इस्कॉन मंदिर रावेत, मोरया गोसावी मंदिर चिंचवड, प्रतिशिर्डी शिरगाव, देहूगाव गाथा मंदिर, भंडारा डोंगर पायथा.
स्वारगेटहून: पौडगाव, सत्य साईबाबा महाराज आश्रम हाडशी (कमान), चिन्मय विभूती योगसाधना ध्यान केंद्र कोळवण.
स्वारगेट/भोसरीहून: चाकण, क्रांतिवीर हुतात्मा राजगुरू स्मारक, सिद्धेश्वर मंदिर राजगुरुनगर, श्रीक्षेत्र खंडोबा मंदिर निमगाव.

Title : PMPML Pune Darshan AC Bus Service Routes

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now