PMPML बसच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आत्ताच करा चेक!

On: May 14, 2025 6:32 PM
PMPML Hike
---Advertisement---

PMPML News | पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) बस प्रवासासाठी लागू असलेले तिकीट दर तब्बल दुप्पट वाढवण्यात आले आहेत. २०१४ पासून कायम असलेल्या किमान १० रुपयांच्या तिकीटाचे दर आता २० रुपयांपर्यंत वाढले असून, यामुळे प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रवाशांना बस प्रवास महाग-

पीएमपीएमएलच्या बसेससाठी लागू असलेले तिकीट दर आता नव्या पद्धतीने निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये चार टप्पे निश्चित करण्यात आले असून, ५ किलोमीटरपर्यंत प्रवासासाठी दर आता १० रुपयांवरून २० रुपये करण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील ५.१ ते १० किलोमीटरसाठी दर २० रुपये, तिसऱ्या टप्प्यातील १०.१ ते १५ किलोमीटरसाठी ३० रुपये, आणि चौथ्या टप्प्यातील १५.१ ते २० किलोमीटरसाठी ४० रुपये आकारले जाणार आहेत.

ही दरवाढ २०१४ मध्ये झालेल्या दरवाढीनंतर प्रथमच करण्यात आली आहे. पीएमपी प्रशासनाने दरवाढीमागील कारणे स्पष्ट करताना इंधन, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि अन्य देखभाल खर्चात मोठी वाढ झाल्याचे सांगितले आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय तिकीट खरेदीसाठी ‘ई-तिकीट’ प्रणालीद्वारे स्मार्ट मोबाईल सोल्यूशन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहितीही प्रशासनाने दिली.

ई-तिकीट व नव्या बससेवेच्या सुविधांवर भर-

पीएमपीएमएलच्या नव्या तिकीट रचनेत सुधारणा करताना प्रवाशांसाठी स्मार्ट मोबाईल प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. यामुळे तिकीट खरेदीसाठी आता स्मार्टफोनद्वारे तिकीट घेण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे रोख व्यवहार कमी होऊन अधिक सुलभ सेवा पुरवली जाईल, असे पीएमपीएमएलच्या अध्यक्षा डॉ. दीपा मुढोळे-मुंडे (Dr. Deepa Mudhol-Munde) यांनी सांगितले.

दरवाढीच्या निर्णयाबरोबरच पुणे शहरात नव्या १००० इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा प्रस्तावही पीएमपी प्रशासनाकडून पुढे करण्यात आला आहे. सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या सुमारे २२०० बस कार्यरत असून, नव्या बसेस आल्यास सेवा अधिक सक्षम होईल. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्य प्रवाशांना यामुळे अधिक चांगली सुविधा मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

News Title – PMPML news Bus Fare Doubled After 10 Years

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now