सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज

On: March 18, 2024 12:45 PM
PM Surya Ghar Scheme
---Advertisement---

PM Surya Ghar Scheme l केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना राबवली आहे. सरकारच्या या योजनेला देशभरातून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा अवघ्या एका महिन्यात एक कोटीहून अधिक कुटुंबांनी लाभ घेण्यासाठी नोंदणी केली आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

देशाच्या सर्व भागांतून नोंदणी सुरू :

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, देशाच्या सर्व भागातून नोंदणी होत आहे. आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये पाच लाखांहून अधिक नोंदणी झाली आहे. ज्या नागरिकांनी अजूनही नोंदणी केली नाही त्यांनी लवकरच नोंदणी करावी. तसेच ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी रोजी सुरू केली होती आणि 29 फेब्रुवारी रोजी मंत्रिमंडळाने या योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेतून प्रत्येक कुटुंबाचे 15 हजार रुपये वाचवू शकतात.

PM Surya Ghar Scheme l या योजनेचा कोण लाभ घेऊ शकत? :

– देशातील प्रत्येक भारतीय नागरिक अर्ज करू शकतो.
– इच्छुक नागरिक https://pmsuryaghar.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.
– लाभार्थी नागरिकांकडे छत असलेले घर असणे आवश्यक आहे.
– घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावर वीजबिल असावे.
– सर्वात महत्वाचं म्हणजे मागील 6 महिन्यांच्या वीज बिलाची पावती असणे आवश्यक आहे.
– कुटुंबाने सौर पॅनेलसाठी इतर कोणत्याही अनुदान योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

PM Surya Ghar Scheme l या कुटुंबांना मिळणार मोफत वीज :

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचे उद्दिष्ट ज्या कुटुंबांनी छतावर सौर उर्जा युनिट बसवण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे आहे. तसेच देशातील सर्वसामान्य कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळू शकतील. या योजनेसाठी सरकारने 75,021 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देखील दिली आहे. तसेच सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार अनुदान देईल. उर्वरित खर्चासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध होईल. हे कर्ज सहा ते सात टक्के दराने दिले जाणार आहे.

News Title : PM Surya Ghar Scheme

महत्त्वाच्या बातम्या –

Vivo कंपनीच्या या सीरीजवर मिळतोय बंपर डिस्काउंट; या तारखेपर्यंत खरेदी करू शकता

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँडवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now