PM Kisan Samman Nidhi | पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Nidhi) देशभरातील कोट्यवधी शेतकरी 22व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी तीन टप्प्यांत प्रत्येकी 2000 रुपये थेट खात्यात जमा केले जातात. मात्र यावेळी काही शेतकऱ्यांना केवळ 2000 नव्हे तर थेट 4000 रुपये मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
गेल्या 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा झाला होता. मात्र अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे किंवा अर्जातील त्रुटींमुळे हा हप्ता मिळाला नव्हता. आता या शेतकऱ्यांनी त्रुटी दूर केल्यास आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यास, त्यांना मागील हप्त्यासह चालू हप्ता मिळून एकूण 4000 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतात 4000 रुपये? :
ज्या शेतकऱ्यांना 21वा हप्ता मिळालेला नव्हता आणि त्यांनी आता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तसेच अर्जातील चुका दुरुस्त केल्या आहेत, अशा पात्र शेतकऱ्यांना दोन हप्त्यांची रक्कम एकत्र मिळू शकते. त्यामुळे त्यांच्या खात्यात थेट 4000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे. (PM Kisan Samman Nidhi)
याशिवाय, नियमितपणे सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे 22व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळतील. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
PM Kisan Samman Nidhi | या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ :
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही किंवा ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी कायम आहेत, अशा लाभार्थ्यांना हा हप्ता मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे तपासून दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, होळीपूर्वी म्हणजेच 4 मार्च 2026 च्या आधी 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.






