तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करतायं? तर मग ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

On: November 21, 2025 3:26 PM
Budget 2026
---Advertisement---

Home Buying | भारतात घर खरेदी करणे ही केवळ खरेदी नव्हे तर एक भावनिक स्वप्न असतं. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या वाढत्या शहरांमध्ये घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. 2025 मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात नव्या खरेदीदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, यापैकी जास्तीत जास्त खरेदीदार वयाच्या 35 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आहेत. (Home Buying Tips)

नव्या आकडेवारीनुसार भारतात तरुण पिढी घर खरेदी करण्यासाठी पुढे येत आहे. तर, 40 टक्के खरेदीदारांनी 75 लाखांपर्यंतच्या घरांना पसंती दिली आहे. वाढलेलं उत्पन्न, स्थिर व्याजदर आणि प्रॉपर्टी दीर्घकालीन गुंतवणूक असल्याचा विश्वास या वाढीमागील महत्त्वाचे घटक आहेत.

गृहकर्ज, व्याजदर आणि EMI – सर्वात महत्त्वाचा टप्पा :

घरे विकत घेण्यासाठी अनेकजण गृहकर्जाचा पर्याय निवडतात. सध्या गृहकर्ज व्याजदर 8 ते 9 टक्क्यांच्या दरम्यान आहे. तज्ज्ञांच्या मते घर खरेदी करण्यापूर्वी बजेट आणि आर्थिक योजना तयार करणे अत्यावश्यक आहे. (Home Buying Tips)

घराच्या किंमतीच्या किमान 20 टक्के रक्कम डाऊनपेमेंट म्हणून ठेवणे आवश्यक आहे. याशिवाय 6 ते 9 महिन्यांच्या EMI इतका आपत्कालीन निधी तयार असला पाहिजे. यामुळे भविष्यातील आर्थिक तणाव कमी होतो.

तसेच पती-पत्नीने संयुक्तपणे गृहकर्ज घेतल्यास इनकम टॅक्स अ‍ॅक्टच्या सेक्शन 80C आणि 24(B) अंतर्गत करसवलतीही मिळू शकतात.

Home Buying | नियोजनाशिवाय घर खरेदी करू नका – तज्ज्ञांचा सल्ला :

घर खरेदी करताना फक्त घराच्या किंमतीकडे पाहणे चुकीचे ठरू शकते. कारण गृहकर्जाव्यतिरिक्त स्टॅम्पड्युटी, नोंदणी शुल्क, इंटेरिअर, मेंटेनन्स, सोसायटी चार्जेस आणि प्रॉपर्टी टॅक्स यांसारखे अतिरिक्त खर्चही येतात.

इझीलोनचे प्रमोद कठुरिया यांच्या मते, “योग्य नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असेल तर घर खरेदी आयुष्यातील सर्वोत्तम आर्थिक निर्णय ठरू शकतो.” (Downpayment Rules)

क्रेडिट स्कोर आणि कर्ज पात्रता – महत्वाची बाब :

घर खरेदी करताना तुमची क्रेडिट हेल्थ (Credit health) मजबूत असणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर जितका चांगला तितका व्याजदर कमी मिळू शकतो. तसेच कर्ज देणाऱ्या बँकांसोबत वाटाघाटी करण्याची क्षमता वाढते. फक्त दर्शनी व्याजदरावर न जाता संपूर्ण कालावधीतील खर्च, व्याजदराचे बदल, प्री-पेमेंट सुविधा आणि उत्पन्नवाढीची शक्यता यांचा विचार करणे फायद्याचे ठरते. (Home Buying Tips)

घर खरेदी करणे हा भावनिक निर्णय असला तरी आर्थिकदृष्ट्या योग्य तयारीनंतरच तो निर्णय घ्यावा, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे. योग्य आर्थिक नियोजन करून खरेदी केलेलं घर हे भविष्याच्या सुरक्षिततेचं मजबूत पाऊल ठरू शकतं.

News Title : Planning to Buy a Home? Key Home Loan, EMI & Downpayment Tips You Must Know

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now