पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनची दहशत; दिवसाढवळ्या हातात चाकू घेऊन फिरला अन्…

On: August 22, 2025 1:39 PM
Pimpri-Chinchwad Mask Man
---Advertisement---

Pimpri-Chinchwad | पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांची मालिका वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये मास्क घालून फिरणाऱ्या एका तरुणाने भरदिवसा हातात धारदार चाकू घेऊन रस्त्यावर हजेरी लावली. यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. (Pimpri-Chinchwad Mask Man Terror)

निगडीतील बजाज ऑटोमोबाईल समोरील एचपी पेट्रोल पंपाजवळ हा मास्क मॅन हातात चाकू घेऊन रस्ता क्रॉस करताना दिसला. त्याने हा चाकू नेमका कोणाला मारण्यासाठी घेतला होता की फक्त नागरिकांना घाबरवण्यासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ओळख लपवण्याचा प्रयत्न :

या मास्क मॅनने चेहऱ्यावर मास्क घालून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. हातात धारदार चाकू घेऊन तो बेधडक फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. रस्त्यावरून ये-जा करणारे लोक घाबरून गेले असून पोलिसांनी या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. (Pimpri-Chinchwad Mask Man Terror)

स्थानिक नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे की, भरदिवसा शहराच्या गर्दीच्या भागात असा व्यक्ती मोकळेपणाने फिरतोय आणि पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचतील कधी? या मास्क मॅनच्या मुसक्या आवळण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pimpri-Chinchwad | पूर्वी कोयता गँगची दहशत :

यापूर्वी मे महिन्यात पुण्यात कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली होती. रात्रीच्या वेळी भररस्त्यात तरुणांचा वाद झाला आणि त्यातून कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणातील चार आरोपींना अटक झाली होती. आता पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क मॅनमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं सावट पसरलं आहे.

पोलिसांनी तातडीने कारवाई करून या मास्क मॅनला पकडलं नाही तर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

News Title: Pimpri-Chinchwad Mask Man Terror: Youth Roams with Knife in Broad Daylight

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now