मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhat) काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलियाने आपल्या मुलीचं नाव राहा असं ठेवलं आहे.
काही दिवसापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी आपल्या पहिल्या अपत्याचं नाव जाहीर केलं होतं. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणेच या दोघांनीसुद्धा नो फोटो पॉलिसी ठेवली आहे.
विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि रणबीर कपूर दिसून येत आहेत.
आलिया आणि रणबीरच्या नो फोटो पॉलिसीचा मीडियाने चेहरा दाखवलेला नाही. या पोस्टमध्ये राहाच्या चेहऱ्यावर ईमोजी लावण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-






