Petrol Diesel Price | ‘या’ शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

On: January 13, 2024 11:26 AM
Petrol Diesel Price
---Advertisement---

Petrol Diesel Price | भारतातील अनेक शहरांमध्ये आज पेट्रोल डिझेलच्या (Petrol Diesel Price) दरात बदल झाला आहे. गुरुग्राम आणि नोएडामध्ये पेट्रोलचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतींचा थेट परिणाम भविष्यात इंधनाच्या किमतींवर होतो. तुम्हीही तुमच्या कारमध्ये पेट्रोल भरणार असाल तर तुमच्या शहरातील किंमत येथे पहा.

पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

शनिवारी, 13 जानेवारी रोजी भारतातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले आहेत. दररोज प्रमाणे आजही सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे. आजचे नवीन किमती महानगरांमध्ये तसेच देशातील सर्व लहान शहरांमध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर होतो. याशिवाय देशातील सरकारी तेल कंपन्या म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड त्यांच्या किमतींवर कर, व्हॅट, कमिशन इत्यादी लावतात.

Petrol Diesel Price | चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि डिझेलची किंमत 89.62 रुपये प्रति लिटरवर कायम आहे.
मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.86 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर इतका कायम आहे.

इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-

नोएडा- पेट्रोल 96.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर
गुरुग्राम- पेट्रोल 96.77 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.65 रुपये प्रति लिटर
बेंगळुरू- पेट्रोल 101.94 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर
चंदीगड- पेट्रोल 96.20 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर
हैदराबाद- पेट्रोल 109.66 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर

महत्त्वाच्या बातम्या- 

Health Update | उपचार करुन सुद्धा खोकला जाईना???, मोठी माहिती आली समोर

Atal Setu Toll l पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, मात्र टोलचे दर ऐकून हैराण व्हाल

IND vs ENG | INDvsEng कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, बड्या खेळाडूला डच्चू नव्या चेहऱ्याची एन्ट्री

Vehicle Owner Details l वाहन क्रमांकावरून समजेल वाहन मालकाचे नाव! जाणून घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

Mclaren 750S Launched l वाह! McLaren कंपनीने लाँच केली 750S सुपरकार, किंमत किती असणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now