पुणे | पिंपरी चिंचवडकरांसाठी (PCMC News) अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (PCMC News) शहरातील अनेक भागात गुरुवारी 21 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
PCMC News | ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद राहणार
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जल शुद्धीकरण केंद्राच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गुरुवारी पाणी पुरवठा बंद करावा लागणार असल्याची माहिती एमआयडीसी प्रशासनाने सांगितलं आहे. यामुळे पिंपरी चिंचवडकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे.
PCMC News | ‘या’ भागात पाणी येणार नाही
पिंपरी चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सी.एम.ई, आर ॲन्ड डी दिघी, व्ही.एस.एन.एल. कॅन्टोनमेंन्ट बोर्ड, ओ.एप.डी.आर. या भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुरा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरूवारी पुणेकरांना संकटाला सामोरं जावं लागणार आहे. तर पुण्यात शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याने पुणेकरांची तारंबळ उडू शकते.
दि. २१ डिसेंबर रोजी पुण्यातील बहुतांश ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे ही विनंती.
पाणीपुरवठा बंद असणारी ठिकाणे पाहण्यासाठी लिंक : https://t.co/3vkaodG7kR pic.twitter.com/bYBmoLFrLq
— PMC Care (@PMCPune) December 19, 2023
महत्त्वाच्या बातम्या-
Variant JN.1 | ‘या’ वयोगटातील नागरिकांना मास्कची सक्ती; सरकारचा मोठा निर्णय
Maratha Reservation | मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी घोषणा!
Weather Update | काळजी घ्या! राज्याच्या ‘या’ भागात थंडी वाढणार
TMKOC च्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!
Navneet Rana | मोठी बातमी! नवनीत राणा आणि रवी राणांना कोर्टाचा मोठा धक्का






