अवघी 4 गुंठे जमीन आणि रहायला झोपडी!, शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

On: April 18, 2024 12:56 PM
Pawan Kumar
---Advertisement---

लखनऊ | देशातील यूपीएससी 2023 परिक्षेचा निकाल जाहीर झालाय. देशातून लखनऊच्या श्रीवास्तवने पहिला रँक मिळवला. श्रीवास्तवची देशभरात चर्चा आहे. अशातच आता बुलंदशाहच्या पवनकुमारने 239 वा रँक मिळवला आहे. पवनकुमार (Pawan Kumar) हा झोपडीत राहणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने केलेल्या कामगिरीचे देशात कौतुक होताना दिसत आहे.

पवनकुमारला (Pawan Kumar) तिसऱ्या फेरीत यश मिळालं. पहिल्या दोन फेरीत त्याला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र त्याने जिद्दीने आपल्या ध्येयाचा मार्ग न सोडता आपलं काम सुरू ठेवलं. त्याचे झोपडीवजा घर आहे. रोजगाराचा आणखीणच तुटवडा. अशा परिस्थितीमध्ये त्याने तिसऱ्या फेरीत यश मिळवलं. आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर अनेकजण आपल्या संकटांना तोंड देऊन सामना करतात, पवनने हे करून दाखवलं आहे.

झोपडीत राहणाऱ्या पवनचा प्रेरणादायी प्रवास

बुलंदशहाच्या सायना तहसील येथे रघुनाथपूर गावात पवनचे कुटुंब झोपडीत राहते. पवनच्या कुटुंबाकडे चार गुंठे जमीन आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो, अशी माहिती समोर आली आहे. पवनच्या कुटुंबामध्ये चार भाऊ आणि बहिण आहे. एवढ्यांच्या पोटापाण्याची सोय करत पवनने (Pawan Kumar) केलेली मेहनत देशातील तरूणांसाठी प्रेरणा आहे. पवनच्या (Pawan Kumar) यशामुळे त्यांच्या कुटुंबाचे अनेकजण अभिनंदन करत आहेत.

स्वयंअध्ययनातून पवनने दिल्लीत राहून 239 वा क्रमांक पटकवला आहे. तिसऱ्या फेरीत त्याला यश मिळालं. यावर पवनचे कुटुंब आनंदी असून त्यांनी पवनच्या यशाबद्दल प्रतिक्रिया दिली.

पवनच्या कुटुंबाची प्रतिक्रिया

पवनची बहिण गोल्डी म्हणाली की, ती आपल्या भावाचं यश शब्दात सांगू शकत नाही. स्वअध्ययनामुळे हे यश मिळवलं आहे. पवनची आई सुमन यांनीही सांगितलं की मुलाच्या यशाने खूप आनंदी आहेत.

News Title – Pawan Kumar Third Attempt In 239 Rank In MPSC Exam

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खान गोळीबार प्रकरणात आरोपींकडून अत्यंत खळबळजनक खुलासा

“भाजपने मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा…”, शिंदे गटाच्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

100 प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर; या यादीत ‘इतक्या’ भारतीयांना मिळाले स्थान

आज पंजाबचे शिलेदार मुंबई इंडियन्सला रोखणार का?

या राशीच्या व्यक्तींने आज प्रवास करणे टाळावा

 

Join WhatsApp Group

Join Now