मोदींनी उडवली राहुल गांधींची खिल्ली, म्हणाले…

On: February 8, 2023 6:53 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जोरदार भाषण केलं. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) अनेक आरोप केले. यालाच मोदींनी प्रत्युत्तर दिलं. मोदी यांनी या भाषणावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं नाव न घेता खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

अध्यक्ष महोदय, सभागृहात भ्रष्टाचार विरोधात तपास करणाऱ्या तपास यंत्रणांबद्दल बरंच काही बोललं गेलं. मी एक पाहिलं की, अनेक विरोधी पक्ष इतरांच्या सुरात सूर मिसळत होते. मिले तेरा मेरा सूर, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ईडीने या लोकांना एका मंचावर आणलं. त्यासाठीजे काम मतदार करू शकले नाही. ते ईडीने केलं, असा टोला मोदींनी विरोधीपक्षाला लगावला.

कुणीतरी अभ्यास करुन टीका करेल ज्यामुळे देशाला फायदा होईल, याची मी वाट पाहतोय. पण गेल्या नऊ वर्ष टीकांनी आरोपांमध्ये घालवलं. आरोपांशिवाय काहीच नाही, असा दावा नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना केला.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now