“थोड्याच वेळात मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन हे नक्की”, पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

On: December 15, 2024 3:43 PM
Pankaja Munde
---Advertisement---

Pankaja Munde l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर आता थोड्याच वेळात मंत्रिमंडळ विस्ताराला सुरवात होणार आहे. मात्र अशातच भाजपाकडून पंकजा मुंडे यांचे मंत्रिपदासाठी नाव निश्चित झालं आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिलांदाच प्रतिक्रिया दिली आहार.

Pankaja Munde l पंकजा मुंडे काय म्हणाल्या? :

आज नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आणि मंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंकजा मुंडे दाखल झाल्या आहेत. मात्र यावेळी पंकजा मुंडे यांना तुम्ही कोणत्या भूमिकेत दिसतील असे विचारण्यात आले होते. यावर त्या म्हणाल्या, “मंत्र्याच्या भूमिकेत दिसेन एवढे मला माहिती आहे. तसेच आता पुढच्या भूमिका पक्षश्रेष्ठीच ठरवणार आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्वी ज्या भूमिका दिल्या त्या निवभावल्या आम्ही आहेत आणि आताही आम्ही निभावू.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

याशिवाय पंकजा मुंडे ही प्रतिक्रिया देताना त्यांच्याबरोबर साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार जयकुमार रावल हे दिग्गज नेते सुद्धा उपस्थित होते. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपाकडून शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार रावल यांना देखील संधी देण्यात येणार आहे.

News Title : pankaja munde statement on maharashtra government cabinet expansion

महत्वाच्या बातम्या –

अखेर फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील 42 मंत्र्यांची नाव फिक्स! पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now