पंकजा मुंडेंची मनोज जरांगेंवर पहिल्यांदाच टीका, थेट म्हणाल्या..

On: April 18, 2024 4:17 PM
Pankaja Munde on Manoj Jarange 
---Advertisement---

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अखेर पक्षाने तिकीट दिलं आहे. त्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपने राजकारणात डावलल्याचा आरोप बऱ्याचवेळा करण्यात आला. याबाबत पंकजा मुंडे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. यावर्षी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

पंकजा मुंडे सध्या जोरदार प्रचार करत आहेत. ‘खासदार म्हणून चांगलं काम करून दाखवेल. आपल्या जिल्ह्याचा विकास करेन. बीड जिल्ह्यात उद्योग आणेल. पुढच्यावर्षी परळीपर्यंत रेल्वे आणणार आहे. आता फक्त संधी द्या. पुढच्यावेळी तुम्ही म्हणाल त्याला खासदार करेन’, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांची जरांगे यांच्यावर टीका

पंकजा मुंडे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत टीका केली. उपोषण काळात पंकजा यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आता मात्र, त्या टीका करताना दिसून आल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

‘सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही’, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांनी यात जरांगे यांचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा निशाणा जरांगे पाटील यांच्यावरच असल्याचं म्हटलं जातंय. आज त्यांनी (Pankaja Munde) जाटनांदूर येथे जाहीर सभा घेतली.

पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

या सभेत पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केलं. ही निवडणूक बीड जिल्ह्याच्या अस्मितेची आहे. मला दिल्लीत जाण्याची हौस आहे म्हणून उमेदवारी मागितली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:हून उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना उमेदवारी मिळावी ही माझी मागणी होती. पण कोअर कमिटीने माझं नाव घेतलं, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या.

‘मी निवडणूक हरल्यानंतरही पाच वर्षात हजारो कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवले. माझ्या जिल्ह्यातील रस्ते चांगले केले, रेल्वे आणली. आता मी पुढच्या वर्षी परळीपर्यंत रेल्वे आणणार. यासोबतच अंबानी यांच्याकडून बीडमध्ये मोठे उद्योग आणण्याचा माझा प्रयत्न आहे. मला बांधणारा धागा बनायचे आहे. कात्री नाही.’, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

News Title : Pankaja Munde on Manoj Jarange 

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर ठरलं… शिंदे गटाचं एक पाऊल मागे, नारायण राणेंची उमेदवारी जाहीर

सलमान खान गोळीबार प्रकरणाला नवं वळण!

पुढील 5 ते 7 दिवस… हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील ‘या’ भागांना पावसाचा इशारा

घरी आलेल्या मैत्रिणीला दिलं गुंगीचं औषध आणि त्यानंतर मैत्रिणीच्या भावानेच…

अवघी 4 गुंठे जमीन आणि रहायला झोपडी!, शेतकऱ्याच्या मुलानं UPSC परीक्षेत मारली बाजी

Join WhatsApp Group

Join Now