“मी पदर पसरते, मला शेवटची…”, रडवेली होऊन पंकजा मुंडे यांची बीडकरांना कळकळीची विनंती

On: April 27, 2024 11:40 AM
Beed Rape Case
---Advertisement---

Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना अखेर पक्षाने तिकीट दिलं आहे. त्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.भाजपने राजकारणात डावलल्याचा आरोप बऱ्याचवेळा करण्यात आला. याबाबत पंकजा मुंडे यांनीही बऱ्याचदा नाराजी व्यक्त केली होती. यावर्षी पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवत लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

पंकजा मुंडे सध्या जोरदार प्रचार करत आहेत. बीडमध्ये झालेल्या सभेत तर पंकजा मुंडे पहिल्यांदाच अगदी रडवलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी बीडकरांना भावनिक आवाहन केलं. “मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन. पण मला आज शेवटची संधी द्या.”, असं बोलताना पंकजा मुंडे दिसून आल्या.

पंकजा मुंडे यांचं मतदारांना आवाहन

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे नेते बजरंग सोनवणे यांच्यावरही टीका केली. ‘मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील सर्वांना मी पदर पसरवून विनंती करत आहे. मला पैसे कमवायचे नाहीत किंवा प्रसिद्धी मिळवायची नाही.’, असं म्हणत त्यांनी मतदारांना निवडून देण्याचं आवाहन केलं.

यावेळी पंकजा मुंडे यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचाही उल्लेख केला. ‘माझ्या वडिलांचा चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असं मी म्हणणार नाही. पण गोपीनाथ मुंडेंची स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. जे त्यांनी तुमच्यासाठी पाहिले होते.’, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांनी म्हटलं.

‘भाऊ म्हणून भीक मागतोय, ताईच्या झोळीत..’

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पाच वर्षे मी घरी होते.पण, तुमच्यासाठी तळतळ जीव तुटत होता. मला बंगले बांधायचे नाहीत. मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत. मला काहीच नकोय. आज मला भीती वाटते की, एवढे लोक माझ्या मागे आहेत. याला दृष्ट नको लगायला. असं मुंडे (Pankaja Munde )यांनी बोलून दाखवलं.

दुसरीकडे धनंजय मुंडेदेखील बहिणीसाठी प्रचार करताना दिसून आले. ‘सगळ्यांची गरज भागवली जाईल, एवढी महायुती सक्षम आणि मजबूत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त आपली मते ताईच्या झोळीत टाका, ही भाऊ म्हणून भीक मांगतो आहे.’, असं धनंजय मुंडे बोलताना दिसून आले. प्रथमच दोघा भाऊ-बहिणीमध्ये हा जिव्हाळा दिसून आल्याने याचीदेखील राजकारणात चर्चा होते आहे.

News Title : Pankaja Munde appeal to the voters

महत्त्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मत हवं, मग मुस्लिम उमेदवार का नाही?’, बड्या नेत्याची कॉँग्रेसवर जाहीर नाराजी

पंजाबच्या तडाखेबाज खेळीपुढे शाहरुखची बोलती बंद; टी20 क्रिकेटमधील सारेच रेकॉर्ड्स झाले चकनाचूर

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील प्रसिद्ध अभिनेता 4 दिवसांपासून बेपत्ता; शेवटच्या पोस्टमुळे खळबळ

मोठी बातमी! राज्यात स्वाइन फ्लूचा शिरकाव; ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुढील तीन दिवस धोक्याचे; राज्यात उष्णतेच्या लाटा कहर करणार

Join WhatsApp Group

Join Now