PAN Card New Rules | देशात 1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्डसंबंधी महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या नव्या नियमांचा थेट परिणाम नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. आतापर्यंत केवळ Aadhaar Card च्या आधारे पॅन कार्डसाठी अर्ज करणे शक्य होते. मात्र आता ही प्रक्रिया अधिक कठोर आणि तपशीलवार करण्यात येणार आहे.
नवीन नियमांनुसार पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही. अर्जदारांना ओळख आणि जन्माशी संबंधित इतर महत्त्वाची कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया पूर्वीपेक्षा थोडी अधिक वेळखाऊ होण्याची शक्यता आहे.
आधारसोबत इतर कागदपत्रेही आवश्यक :
सध्या 31 मार्च 2026 पर्यंत पॅन कार्डसाठी अर्ज करताना केवळ Aadhaar Card वापरून प्रक्रिया पूर्ण करता येत होती. मात्र 1 एप्रिल 2026 पासून नवीन नियम लागू झाल्यानंतर ही सुविधा बदलणार आहे.
नव्या नियमानुसार अर्जदारांना आधारसोबत इतर कागदपत्रेही सादर करावी लागतील. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, दहावीचे प्रमाणपत्र किंवा इतर सरकारी ओळखपत्रांचा समावेश असू शकतो. या बदलामुळे Permanent Account Number मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुरक्षित होणार असल्याचे सांगितले जात आहे.
PAN Card New Rules | आधारशी माहिती जुळणे अनिवार्य :
नवीन नियमांनुसार पॅन कार्डवरील माहिती आधार कार्डवरील तपशीलांशी पूर्णपणे जुळणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी आधारवरील नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती अचूक असल्याची खात्री करणे आवश्यक ठरणार आहे.
याशिवाय सरकारकडून नवीन अर्ज फॉर्मही लागू करण्यात येणार आहेत. 1 एप्रिल 2026 नंतर पॅन कार्डसंबंधी सर्व प्रक्रिया या नवीन अर्ज फॉर्मद्वारेच करावी लागेल. जुने अर्ज यापुढे वैध राहणार नाहीत. त्यामुळे पॅन कार्डसाठी अर्ज करण्याचा विचार करणाऱ्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आधीच करून ठेवणे गरजेचे आहे. (PAN Card New Rules)
या बदलांचा उद्देश पॅन कार्ड प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि फसवणूक टाळणे हा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवीन नियमांनुसार अर्ज प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि नियंत्रित होणार आहे.






