शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अपहरण प्रकरणी खळबळजनक खुलासा समोर!

On: January 29, 2025 5:52 PM
Ashok Dhodi
---Advertisement---

Ashok Dhodi l पालघरमधील (Palghar) शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकारी अशोक धोडी (Ashok Dhodi) हे मागील 10 दिवसांपासून बेपत्ता (Missing) आहेत. त्यामुळे धोडी यांचे अपहरण (Kidnapping) किंवा घातपात (Assassination) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले होते. त्यातील अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश उर्फ आवी धोडी हा संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला आहे. पोलीस (Police) आता अविनाश धोडीचा शोध घेत आहेत. अशातच आता अविनाश धोडीच अशोक धोडी यांच्या अपहरणाचा मुख्य सूत्रधार (Mastermind) असल्याचा खळबळजनक खुलासा धोडी कुटुंबीयांनी (Dhodi Family) केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी अशोक धोडींचे भाऊ अविनाश धोडी हेच अशोक धोडी यांच्या अपहरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. अविनाश धोडी हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर आतापर्यंत 15 पेक्षा जास्त गुन्हे (Crimes) दाखल असल्याचा दावा देखील अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

अविनाश धोडीला लवकरात लवकर अटक करून आमच्या वडिलांना सुखरूप घरी सोडावे, असे आवाहन अशोक धोडी यांचा मुलगा आकाश (Akash) याने केले आहे. तसेच आरोपी अविनाश धोडीपासून आमच्या जीवालाही धोका (Life Threat) असल्याची भीती त्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे कुटुंबीयांच्या या आरोपानंतर अशोक धोडी यांच्या अपहरणात सख्खा भाऊच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात आठ पथके (Teams) विविध ठिकाणी तैनात करून तपास सुरू करण्यात आला होता. यामध्ये 4 जणांना ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. तसेच संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी (Gholvad Police) अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावले होते. पण घोलवड पोलीस ठाण्याऐवजी पोलीस चौकीवर (Police Chowki) अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता. पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला. त्यानंतर आता घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून (Local Crime Branch) अविनाश धोडीचा शोध सुरू आहे.

सहा पथके आरोपीच्या मागावर :

जमीन (Land) आणि संपत्तीच्या (Property) वादातून (Dispute) अशोक धोडी यांचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय पोलिसांना बळावला होता. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस तपास करत आहेत.

पालघर पोलिसांची 6 वेगवेगळी पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. डहाणू (Dahanu), वाणगाव (Vangaon), नागझरी (Nagzari), गुजरातच्या (Gujarat) दादरा नगर हवेली (Dadra Nagar Haveli) परिसरात पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. त्यामुळे आज दुपारपर्यंत अशोक धोडी अपहरण प्रकरणाचे सर्व खुलासे होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमुळे पालघर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून अशोक धोडी यांची सुटका करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

News Title: Palghar-Shiv-Sena-Shinde-Group-Leader-Ashok-Dhodi-Kidnapping-Brother-Avinash-Dhodi-Mastermind-Family-Claims

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now