पाकिस्तानने घेतला ऑपरेशन सिंदूरचा धसका; पाकच्या संरक्षणमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर

On: May 7, 2025 11:29 AM
Operation Sindoor
---Advertisement---

Operation Sindoor | भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादी तळांवर केलेल्या धडक कारवाईनंतर पाकिस्तान (Pakistan) चांगलाच धास्तावल्याचे चित्र आहे. भारताने (India) कारवाई थांबवल्यास पाकिस्तानही (Pakistan) पुढील पावले उचलणार नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ (Khawaja Muhammad Asif) यांनी दिली आहे.

संरक्षणमंत्र्यांची प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी (Indian Armed Forces) १५ दिवसांत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) यशस्वी केले. या कारवाईत फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर करत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. यात लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) दोन टॉप कमांडर, अब्दुल मलिक (Abdul Malik) आणि मुदस्सीर, मुरिदकेतील (Muridke) मरकझ तय्यबा मशिदीवरील (Markaz Tayyaba Mosque) हल्ल्यात ठार झाल्याची माहिती आहे.

भारताच्या (India) या एअर स्ट्राईकनंतर (Air Strike) पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ (Khawaja Muhammad Asif) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. “भारताने (India) कारवाई थांबवली तर पाकिस्तान (Pakistan) देखील (पुढील) पाऊल उचलणार नाही,” असे ते म्हणाले. यातून पाकिस्तानवर (Pakistan) या कारवाईचा मोठा दबाव आल्याचे स्पष्ट होते.

पंतप्रधान शरीफ यांची आक्रमक भाषा, प्रत्युत्तराचा इशारा

संरक्षणमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर, पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी मात्र भारताच्या (India) कारवाईवर आक्रमक प्रतिक्रिया दिली. “भारताने (India) काही ठिकाणी हल्ले केले आहेत. भारताच्या (India) या युद्धासारख्या कृतीला जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला (Pakistan) पूर्ण अधिकार आहे आणि जोरदार उत्तर दिले जाईल,” असे शरीफ (Sharif) म्हणाले.

“संपूर्ण पाकिस्तानी (Pakistani) देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तानी (Pakistani) राष्ट्र आणि लष्कर शत्रूचा सामना कसा करायचा हे चांगल्या प्रकारे जाणते. शत्रू त्यांच्या इराद्यात यशस्वी होणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी दिली. भारताने (India) बहावलपूर (Bahawalpur), मुरीदके (Muridke), सवाई (Sawai), गुलपूर (Gulpur), बिलाल (Bilal), कोटली (Kotli), बरनाला (Barnala), सरजाल (Sarjal) आणि महमूना (Mahmuna) या नऊ ठिकाणी हल्ले केले होते.

News title : Pakistan’s Reaction to Operation Sindoor

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now