भारताने पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडलं; पाकिस्तान लष्कराची मोठी कबुली

On: May 7, 2025 11:42 AM
Operation Sindoor
---Advertisement---

Operation Sindoor | भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या धडक कारवाईनंतर पाकिस्तान (Pakistan) चांगलाच धास्तावल्याचे चित्र आहे. या कारवाईदरम्यान भारताने पुलवामाच्या पंपोर क्षेत्रात घुसखोरीचा प्रयत्न करणारे पाकिस्तानी लढाऊ विमान पाडल्याचे वृत्त आहे, तसेच सीमेवर S400 एअर डिफेन्स मिसाईल प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे. भारताने (India) कारवाई थांबवल्यास पाकिस्तानही पुढील पावले उचलणार नाही, अशी सावध प्रतिक्रिया पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी दिली आहे.

पाक लष्कराची कबुली :

जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी १५ दिवसांत ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) यशस्वी केले. या कारवाईत फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी स्काल्प (SCALP) क्षेपणास्त्रांचा वापर करत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले. भारताने  केलेल्या हल्ल्याची कबुली पाकिस्तान लष्करानेही दिल्याचे वृत्त आहे.

लक्ष्य करण्यात आलेल्या ९ ठिकाणांमध्ये लाहोरमधील (Lahore) मोहल्ला जोहर (येथे हाफिज सईदला लपवण्यात आले होते, कोटली, मुझफ्फराबाद, अहमदपूर पूर्व बहावलपूरमधील शोभानुल्लाह मशीद (येथे मसूद अझहरचा (Masood Azhar) ठावठिकाणा उद्ध्वस्त झाल्याचे म्हटले जाते), मुरिदके (Muridke) (लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय), इस्लामाबाद, फैसलाबाद आणि सियालकोट (Sialkot) येथील जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे प्रशिक्षण तळ यांचा समावेश होता. लष्कर-ए-तैयबाचे दोन टॉप कमांडर, अब्दुल मलिक (Abdul Malik) आणि मुदस्सीर, मुरिदकेतील (Muridke) मरकझ तय्यबा मशिदीवरील (Markaz Tayyaba Mosque) हल्ल्यात ठार झाल्याची माहिती आहे. भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) या कारवाईनंतर सरावही सुरू केला आहे.

Operation Sindoor | संरक्षण मंत्रालयाचे निवेदन :

भारताच्या (India) संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) स्पष्ट केले की, “आमची कारवाई केंद्रित, विचारपूर्वक केलेली आणि तणाव न वाढवणारी होती. कोणत्याही पाकिस्तानी (Pakistani) लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले नाही. भारताने (India) लक्ष्य निवडण्यात आणि कारवाईच्या पद्धतीत प्रचंड संयम दाखवला आहे.” पहलगाम (Pahalgam) हल्ल्यात २५ भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाच्या हत्येला जबाबदार असलेल्यांना शिक्षा दिली जाईल, या आमच्या वचनबद्धतेनुसार हे पाऊल उचलले गेले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) बाबत सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असेही मंत्रालयाने म्हटले.

भारताच्या (India) या एअर स्ट्राईकनंतर (Air Strike) पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ (Khawaja Muhammad Asif) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले. “भारताने (India) कारवाई थांबवली तर पाकिस्तान (Pakistan) देखील (पुढील) पाऊल उचलणार नाही,” असे ते म्हणाले. यातून पाकिस्तानवर (Pakistan) या कारवाईचा मोठा दबाव आल्याचे स्पष्ट होते.

पंतप्रधान शरीफ यांची आक्रमक भाषा, प्रत्युत्तराचा इशारा

संरक्षणमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर, पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी मात्र भारताच्या (India) कारवाईवर आक्रमक प्रतिक्रिया दिली. “भारताने (India) काही ठिकाणी हल्ले केले आहेत. भारताच्या (India) या युद्धासारख्या कृतीला जोरदार उत्तर देण्याचा पाकिस्तानला (Pakistan) पूर्ण अधिकार आहे आणि जोरदार उत्तर दिले जाईल,” असे शरीफ म्हणाले.

“संपूर्ण पाकिस्तानी (Pakistani) देश सशस्त्र दलांसोबत उभा आहे. पाकिस्तानी (Pakistani) राष्ट्र आणि लष्कर शत्रूचा सामना कसा करायचा हे चांगल्या प्रकारे जाणते. शत्रू त्यांच्या इराद्यात यशस्वी होणार नाहीत,” अशी प्रतिक्रिया शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी दिली.

News title : Pakistan’s Reaction to Operation Sindoor

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now