‘पाकिस्तानी क्रिकेटपटूंची पत्नीविषयी आवड म्हणजे…’; Sania Mirza ने केला मोठा खुलासा

On: January 23, 2024 7:03 PM
sania mirza
---Advertisement---

Sania Mirza | भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा गेल्या काही दिवसांपासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सानियाचा पती आणि पाकस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक या दोघांच्या नात्याबदल चर्चा उधाण आलं होतं. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद सोबत लग्नगाठ बांधली त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला. शिवाय नेटकऱ्यांनी सानियाला (Sania Mirza) देखील दोष देत तिला ट्रोल केलं. मात्र, सानियाने एक नवा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाली Sania Mirza?

एका जुन्या मुलाखतीमध्ये सानिया (Sania Mirza) आणि तिचा पती शोएबला बोलवलं होतं. यावेळी सानियाला काही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र याच वेळी अणखी प्रश्न विचारला ज्याची सध्या जोरदार चर्चा सुुरु आहे. मुलाखतीत पाकिस्तानी क्रिकेटर्स त्यांच्या बायकांसोबत कसे वागतात यावर सानिया हिने मोठं वक्तव्य केलं होतं.

सानिया म्हणाली की, “पाकिस्तानी क्रिकेटर्स फक्त त्यांच्या बायकांची खिल्ली उडवतात. पुढे ती म्हणाली की, पाकिस्तानी क्रिकेटपटूंची सर्वांत मोठी आवड म्हणजे स्वतःच्या पत्नीची खिल्ली उडवणे आहे”, सध्या सर्वत्र सानिया मिर्झा हिने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. शोएब मलिक याने सानिया हिच्यासोबत असलेले सर्व संबंध मोडत पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत लग्न केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर सध्या शोएबला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. सानियालाही अनेक भारतीयांनी उपदेशाचे डोस दिले आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये फक्त आणि फक्त शोएब आणि सानिया यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत.

शोएब आणि सनाचे फोटो व्हायरल

शोएब आणि सना यांनी लग्न करत सर्वांनाच धक्का दिलाय. शोएब मलिकने त्याच्या लग्नचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबने लिहिलं होतं- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच त्याने सनासोबतचा एक फोटोही शेअर केला होता.

News Title : Pakistani cricketers treat their wife’s tell sania mirza

महत्त्वाच्या बातम्या-

Post Office Scheme For Womens | पोस्ट ऑफिसने महिलांसाठी आणली ‘ही’ खास योजना; 2 वर्षात जमतील 2 लाख

Manoj Jarange | मनोज जरांगेंचा झंजावात पुण्यात; ‘हे’ रस्ते राहतील बंद

Amitabh bachchan | अमिताभ बच्चन यांना आली रेखाची आठवण?, फोटो पोस्ट करत म्हणाले

Shreyas Talpade | ‘… हा तर मराठी इंडस्ट्रीचा विजय थालापती’, प्रसिद्ध अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

Manoj Jarange | ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; जरांगेंचा सरकारला अत्यंत गंभीर इशारा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now