Ram Mandir | पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने शेअर केले श्रीरामाचा फोटो, म्हणाला ‘माझा रामलल्ला…’

On: January 19, 2024 9:02 PM
Ram Mandir
---Advertisement---

Ram Mandir | अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात (Ram Mandir) होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा विधींना सुरुवात झाली आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातील लाखो लोक उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 22 तारखेला दिवाळी साजरी करा, असं आवाहन देखील केलं आहे.

याच बरोबर, मोदींचा सोलापूर दौरा पार पडला. यावेळी त्यांनी 22 तारखेला संध्याकाळी सर्वांनी घराघरात रामज्योती लावावी, असं देखील सांगितलं आहे. एकीकडे उत्साह (Ram Mandir) सुरु असताना पाकिस्तानी खेळाडूने त्याच्या X अकाउंटवर रामाचा फोटो शेअर केला आहे.

पाकिस्तानी खेळाडूने केलेलं ट्विट

संपूर्ण देशभरातील रामभक्त (Ram Mandir) या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. देशभरात राममय भगवं वातावरण तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच राम मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती पाकिस्तानी खेळाडूने केलेल्या ट्विटची.

पाकिस्तान संघामधील माजी खेळाडू राहिलेल्या दानिश कनेरिया याने प्रभु श्री रामाचा (Ram Mandir) फोटो शेअर केला आहे. पाकिस्तानचा असूनही त्याने रामाचा फोटो कसा काय पोस्ट केला?, असा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला असेल. मात्र दानिश कनेरिया हा पाकिस्तानमध्ये असला तरीसुद्धा तो एक कट्टर हिंदू आहे.

दानिशने काय ट्विट केलं?

पाकिस्तान संघाचा माजी  खेळाडू असलेला दानिश कनेरियाचा ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. दिनेशने त्याच्या अधिकृत X  रामाचा चेहरा झाकलेला फोटो शेअर केला आहे. दानिश याने फोटो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी आणि रामभक्तांनी तो खरा कट्टर हिंदू असल्याचं म्हटलं आहे.

दानिश रामाचा भक्त

दानिश पाकिस्तानी संघाकडून जरी खेळत असला तरी मात्र, त्यांने गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राम मंदिराच्या समर्थनार्थ करत अनेक ट्विट केले आहेत. या शिवाय दानिशला अनेकवेळा हिंदू असल्यामुळे चुकीची वागणूक देखील देण्यात आल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाहीतर त्याला धर्मांतर करत मुस्लिम होण्यासाठी दबाव टाकल्याचंही कनेरिया म्हणाला होता.

News Title : Pakistani cricketer shares ram manidir photos

महत्त्वाच्या बातम्या-

Ira Khan Wedding Teaser | आमिरच्या लेकीने शेअर केला लग्नाचा टीझर, पाहा व्हिडीओ

Ram Mandir | रामलल्लाच्या मूर्तीची गर्भगृहात स्थापना, ‘या’ ठिकाणी विराजणार भाऊ लक्ष्मण-भरत आणि शत्रुघ्न

Ram Mandir | रामलल्लाची मूर्ती आली समोर; भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फोटो

Ram Mandir | 22 तारखेला महाराष्ट्रात सुद्धा सुट्टी जाहीर, पाहा सरकारी आदेशात काय म्हटलंय

Pune News | अदानी कंपनीचं पुणेकरांना मोठं गिफ्ट!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now