पाकिस्तानकडून अंबानी-अदानींना धोका; हाय अलर्ट जारी

On: May 8, 2025 10:13 AM
Adani & Ambani Threat
---Advertisement---

Adani & Ambani Threat | ऑपरेशन सिंदूरनंतर (Opration Sindhoor) भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणामुळे गुजरातमधील ऊर्जा प्रकल्पांवर (Gujrat Urja Project) संभाव्य हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे रिलायन्स आणि अदानी समूहाचे प्रकल्प हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने गुजरातमधील सीमावर्ती भागात सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ केली असून, बीएसएफ आणि वायूदलाकडून कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. (Adani & Ambani Threat)

खावडा सौर ऊर्जा पार्क आणि जामनगर रिफायनरी केंद्रस्थानी :

गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्क हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प मानला जातो. याची एकूण क्षमता ४५ गीगावॅट असून, यातील ३० गीगावॅट क्षमता अदानी ग्रीन कंपनीकडे आहे. हा प्रकल्प पाकिस्तान सीमेलगत केवळ १ किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे सतत बीएसएफच्या देखरेखीखाली ठेवला जातो. (Adani & Ambani Threat)

तसेच, जामनगरमधील रिलायन्स ऑइल रिफायनरी ही जगातील सर्वांत मोठी रिफायनरी आहे, जिथे दररोज १४ लाख बॅरल तेलाचे शुद्धीकरण होते. याठिकाणी एअरबेस असल्याने हा परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषित केला गेला आहे.

Adani & Ambani Threat | केंद्र सरकारचा तात्काळ निर्णय, विमानतळांवर बंदी :

भारत सरकारने जामनगर, नलिया, भुज या हवाई तळांसह संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी केला आहे. जामनगर विमानतळासह देशातील २४ प्रमुख विमानतळ ९ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी संबंधित कंपन्यांना सायबर सुरक्षा, भौतिक सुरक्षा, आणि कर्मचारी प्रशिक्षण यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

हार्टेक ग्रुपचे सीईओ सिमरप्रीत सिंग यांनी सांगितले की, अशा धोका असलेल्या प्रकल्पांसाठी सीमा भिंती, देखरेख यंत्रणा, ड्रोन निगराणी, सायबर सुरक्षा आणि सुरक्षा ड्रिल्स या सर्व गोष्टी अत्यावश्यक आहेत. यासोबतच विमा पॉलिसीद्वारे आर्थिक धोका व्यवस्थापित करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. (Adani & Ambani Threat)

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून कारवाईची शक्यता?:

ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) अंतर्गत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर, पाकिस्तानकडून देशांतर्गत हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता गृहीत धरून ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुजरातमधील ऊर्जा व संरक्षण प्रकल्प हे दुहेरी टार्गेट ठरू शकतात.

News Title: Pakistan Threatens Adani-Ambani Projects, India Issues High Alert in Gujarat Near Border

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now