India Pakistan War Update | भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दरम्यान, एका गुप्तचर अहवालातून पाकिस्तानची लष्करी तयारी फारच मर्यादित असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पाकिस्तानकडे केवळ 4 दिवस पुरेल एवढाच दारुगोळा उरला असून, दीर्घकालीन युद्ध लढण्याची क्षमता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. (India Pakistan War Update)
पाकिस्तानकडून युद्धासाठी फक्त 96 तासांची तयारी :
गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानी लष्कर (Pakistan) केवळ 96 तास म्हणजेच 4 दिवस युद्ध लढू शकण्याच्या स्थितीत आहे. त्यांचा तोफखाना आणि क्षेपणास्त्र साठा अत्यंत कमी झाला आहे. भारताने जर पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू केलं, तर पाकिस्तानला शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पाकिस्तानने अलीकडेच युक्रेन व इस्रायलला मोठ्या प्रमाणात 155 मिमी हॉवित्झर शेल आणि 122 मिमी बीएम-21 रॉकेट निर्यात केली आहे. फेब्रुवारी ते मार्च 2023 दरम्यान केवळ युक्रेनलाच 42,000 रॉकेट्स आणि 60,000 शेल पाठवण्यात आले, यामुळे देशांतर्गत साठा रिकामा झाला आहे.
India Pakistan War Update | आर्थिक संकटात पाकिस्तान, लष्करी सरावही स्थगित :
पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरी (POF) ची जुनाट उत्पादन पद्धती, वाढती जागतिक मागणी आणि देशातील गंभीर आर्थिक स्थिती यामुळे लष्करी पुरवठा ठप्प झाला आहे. महागाई, कर्जवाढ आणि घटता परकीय चलन साठा यामुळे लष्करी रेशनमध्ये कपात व सराव स्थगित करण्यात आला आहे. 2 मे 2025 रोजी झालेल्या कॉर्प्स कमांडर्स परिषदेतही ही चिंता व्यक्त करण्यात आली होती. (India Pakistan War Update)
माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी पूर्वीच स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानकडे भारतासोबत दीर्घ युद्ध लढण्याची ना दारुगोळा क्षमता आहे ना आर्थिक साधनं. भारताच्या जोरदार आक्रमक प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानला आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं आहे.






