India Pakistan Conflict | भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan Conflict) ७ मेनंतर सलग तीन रात्री चाललेल्या संघर्षात भारताने मोठी कामगिरी बजावली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ (Opration Sindhoor) अंतर्गत भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईनंतर आता पाकिस्तानने पहिल्यांदाच कबुली दिली आहे की, भारताने त्यांच्या फायटर जेटला हिट केलं आहे.
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने रविवारी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांशी बोलताना याची अधिकृत कबुली दिली. त्यांनी म्हटलं की, भारतासोबतच्या संघर्षात त्यांच्या एका फायटर विमानाचं ‘थोडंसं नुकसान’ झालं आहे. मात्र, कोणतं विमान होतं, कधी आणि कुठे हिट झालं – याचा तपशील देण्याचं त्यांनी टाळलं. (India Pakistan Conflict)
डॉगफाईटमधील निर्णायक क्षण : भारताची हिट मोहीम :
भारतीय हवाई दलाचे DGAO एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट संकेत दिले की, भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि फायटर जेट्स हिट केले आहेत. त्यांनी सांगितलं, “पाकिस्तानचं पाडलेलं विमान हे अत्याधुनिक (हायटेक) होतं. अशा गोष्टी लपून राहत नाहीत. लवकरच सर्व माहिती समोर येईल.”
भारताने किती फायटर जेट्सला लक्ष्य केलं, याचा नेमका आकडा भारतीय लष्कराकडे आहे आणि तो योग्य वेळी उघड केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
India Pakistan Conflict | पाकिस्तानचं स्पष्टीकरण : पायलट भारताचा नाही :
पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये कबुली दिली की, त्यांच्या एका विमानाचं नुकसान झालं आहे. मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केलं की, “भारताचा कुठलाही पायलट पाकिस्तानच्या ताब्यात नाही. अशा अफवा चुकीच्या आहेत.” (India Pakistan Conflict)
युद्धसदृश परिस्थितीत अशा घटना लपून राहिल्या नसतात. भारताने जे कारवाई केली त्याची प्रत्यक्ष कबुली आता पाकिस्तानकडून आली आहे, ही भारतीय लष्करासाठी मोठी रणनीतिक विजय मानली जात आहे.






