पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी कुठं गेले? NIA ने दिली महत्वाची माहिती

On: April 28, 2025 10:38 AM
Pahalgam Terror Attack
---Advertisement---

Pahalgam Terror Attack | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता सहा दिवस उलटले आहेत. मात्र, हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असूनही, हल्लेखोरांचा ठावठिकाणा मिळालेला नाही. (Pahalgam Terror Attack)

या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) कडे सोपवण्यात आला आहे. एनआयएने मृत पर्यटकांचे नातेवाईक, जखमी झालेले पर्यटक तसेच स्थानिक लोकांची चौकशी केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एनआयए (NIA) तपास करत आहे आणि काही महत्त्वाचे संकेत मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणात काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हल्लेखोर पाकिस्तानात पळाले की स्थानिक मदतीने लपले? :

सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर पाकिस्तानात पळून गेल्याची शक्यता आहे. तर काही अहवाल असेही सुचवतात की, स्थानिक लोकांच्या मदतीने ते जम्मू-काश्मीरमध्येच कुठेतरी लपून बसले आहेत. या सर्व शक्यतांचा एनआयए सखोल तपास करत आहे. (Pahalgam Terror Attack Updates)

हल्ला घडलेल्या बैसरन खोऱ्यात त्या वेळी सुरक्षा व्यवस्था कमकुवत होती. बैसरनच्या खाली सुमारे ५ किमी अंतरावर सीआरपीएफची चौकी असली तरी हल्ला होत असताना बैसरनमध्ये कोणतेही पोलीस किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते. त्यामुळे हा हल्ला झाल्यानंतर ४५ मिनिटांनंतरच पोलीस आणि सीआरपीएफ घटनास्थळी पोहोचले. हा सुरक्षेतील गंभीर त्रुटीचा भाग असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मान्य केले आहे.

Pahalgam Terror Attack | पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय :

हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ज्या भागांमध्ये सुरक्षा यंत्रणा मजबूत नाही, अशा ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला जात आहे. संवेदनशील भागांमध्ये ‘नो एंट्री’ नियम लागू करण्यात येणार आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालता येईल.

एनआयएच्या तपासातून लवकरच हल्लेखोरांचे ठिकाण आणि हल्ल्यामागील कट रचणाऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे आणि स्थानिक तसेच पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत नवे कठोर धोरण स्वीकारले जाण्याची शक्यता आहे.

News Title: Pahalgam Terror Attack: Where Did the Terrorists Go? Major Update on NIA Investigation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now