हादरवणारी बातमी! बैसरनसह ‘या’ 3 पर्यटनस्थळांवर होता हल्ला करण्याचा प्लॅन

On: May 1, 2025 11:36 AM
Pahalgam Terror Attack
---Advertisement---

Pahalgam Terror Attack | जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) आणि काश्मीर पोलिसांना अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. हल्ल्याच्या सात दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये दाखल झाले होते, आणि त्यांनी बैसरनसह आणखी तीन लोकप्रिय पर्यटनस्थळांवर हल्ला करण्याची तयारी केली होती.

एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, आतापर्यंत 2500 संशयितांची चौकशी झाली आहे. त्यापैकी 186 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 20 हून अधिक ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) ची ओळख पटली असून, त्यातील चौघांनी पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांना रेकीसाठी मदत केल्याचे उघड झाले आहे.

कोणती होती हल्ल्याची ठिकाणं? :

दहशतवादी 15 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये पोहोचले होते. त्यांच्या टार्गेटवर बैसरन खोऱ्यासह खालील तीन पर्यटनस्थळं होती:

आरु खोरे
एम्यूजमेंट पार्क
बेताब व्हॅली

परंतु या तीन ठिकाणी सुरक्षा कडक असल्यामुळे दहशतवाद्यांचा हल्ल्याचा प्लॅन अयशस्वी ठरला आणि त्यांनी फक्त बैसरन खोऱ्यावर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.

Pahalgam Terror Attack | टूलकिटमधून मिळाले आदेश :

तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या टूलकिटमध्ये काही महत्वाचे दस्तऐवज मिळाले आहेत. त्यात उल्लेख आहे की, दहशतवाद्यांनी इस्लामिक पोशाखांपासून दूर राहावे आणि स्थानिक रिवाजांनुसार कपडे परिधान करावेत, असे स्पष्ट आदेश त्यांना पाकिस्तानातून देण्यात आले होते.

हा हल्ला पूर्वनियोजित होता, त्यासाठी काही स्थानिकांनी थेट मदत केली, हे देखील उघडकीस आले आहे.

News Title: Pahalgam Terror Attack: Lashkar Militants Planned Strikes at 4 Tourist Spots Including Baisaran, NIA Probe Reveals Local Support

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now